सांस्कृतिक शहर आणि शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात तरुणाई मोठ्या प्रमाणात झिंगाट होताना पाहायला मिळत आहे. पुणे पोलिसांनी यावर आता कारवाई करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दशकभरातील पहिल्या सात वर्षात जप्त केलेल्या अमली पदार्थांचा माल या वर्षी अवघ्या सात महिन्यातचं जप्त करण्यात आलाय. अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर गुन्हे शाखेने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अमली पदार्थ तस्करींची पाळेमुळे शोधून काढण्यात येत आहेत.