पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची गणेशोत्सव तयारीची पाहणी

पुणे – गणेशोत्सवाची धामधूम अवघ्या काही दिवसांवर आली असताना पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील प्रमुख गणेश मंडळांची पाहणी केली. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“मेट्रो प्रकल्पामुळे यंदा काही ठिकाणी वाहतूक व्यवस्थापनाचे आव्हान आहे. त्यामुळे अतिरिक्त उपाययोजना करण्यात आल्या आहेत. गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने परिसराची पाहणी करून सुरक्षेची संपूर्ण तयारी केली आहे. नागरिकांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सव हा राज्याचा प्रमुख उत्सव असल्याने सर्व सुविधा आणि सोयीसुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुणे गुन्हे शाखा सतत सक्रिय राहणार असून गुन्हेगारी व सुरक्षाविषयक घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथके नियुक्त केली जाणार आहेत.
बेकायदेशीर कृत्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून, सीसीटीव्हीच्या माध्यमातून सतत लक्ष ठेवले जाईल. “गणेश मंडळांकडून १०० टक्के नियमांचे पालन केले जात आहे. न्यायालयाने घालून दिलेल्या अटींशिवाय कोणतेही अतिरिक्त निर्बंध लादले जाणार नाहीत. परंतु पोलिस आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन सर्वांनी करावे,” असे आवाहन अमितेशकुमार यांनी केले. विसर्जन मिरवणुकीबाबत योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी नमूद के





