Pune News : स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन; ‘इराणी टी कॅफे’चा परवाना निलंबित
अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत स्वच्छता व आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन तसेच मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळून आल्याने संबंधित आस्थापनावर कारवाई करण्यात आली.

Pune News – कोंढवा खुर्द येथील येवलेवाडी परिसरातील ‘इराणी टी कॅफे (Irani Cafe Tea ) ‘चा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत स्वच्छता व आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन तसेच मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळून आल्याने संबंधित आस्थापनावर कारवाई करण्यात आली.
अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायांचे परवाना व नोंदणी) नियम, २०११ मधील परिशिष्ट-४ मध्ये नमूद केलेल्या स्वच्छता आणि आरोग्यविषयक आवश्यक अटींचे पालन करण्यात त्रुटी आढळल्या. तपासणीदरम्यान मुदतबाह्य अन्नपदार्थही सापडल्याने अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली. (Pune News )
नियमांचे पालन होईपर्यंत संबंधित आस्थापनाचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. (Pune News )






