Pune News : कॉसमॉस को-ऑप बँकेची १२० वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न !
कॉसमॉस को-ऑप. बँक लि. या मल्टिस्टेट शेड्यूल्ड बँकेला दि. ३१ मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात रु.११८.१२ कोटींचा निव्वळ नफा झाला असल्याचे बँकेचे अध्यक्ष सचिन आपटे यांनी जाहीर केले.

Pune News : कॉसमॉस को-ऑप. बँक लि. या मल्टिस्टेट शेड्यूल्ड बँकेला दि. ३१ मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात रु.११८.१२ कोटींचा निव्वळ नफा झाला असल्याचे बँकेचे अध्यक्ष सचिन आपटे यांनी जाहीर केले.
मार्च २०२६ अखेर संपलेल्या वर्षात बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून एकूण निधी रु.२,७७८ कोटी आहे तर बँकेच्या भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण (सीआरएआर) १५.२१ % आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता बँकेने सभासदांकरिता १०% लाभांश जाहीर केला आहे.
बँकेची १२० वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. ७ जुलै २०२६ रोजी सहकार सभागृह, २ रा मजला, कॉसमॉस भवन, युनिव्हर्सिटी रोड, गणेशखिंड पुणे येथे बँकेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
सर्वसाधारण सभेची सुरुवात करताना बँकेचे अध्यक्ष सचिन आपटे यांनी सर्व उपस्थित सभासदांचे स्वागत केले आणि दि. ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवी रु. २६,१२२ कोटींवर पोहोचल्या असून, बँकेने रु.१७,८७९ कोटींचे कर्जवितरण केले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेले, रु. ३ कोटीपर्यंतच्या रिटेल कर्जाचे प्रमाण ५०% राखणे आवश्यक होते ते बँकेने ५२.५१% राखले आहे.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय रु.४४,००० कोटींपेक्षा अधिक झाला असून गुजरातमध्ये १० नवीन शाखा सुरू करण्यात आल्यामुळे बँकेच्या एकूण शाखा १९३ झाल्या आहेत.
बँकेच्या सदर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मोठ्या संख्येने सभासद त्याचप्रमाणे बँकेचे उपाध्यक्ष सीए डॉ. यशवंत कासार व संचालक मंडळातील इतर सर्व संचालक सदस्य, व्यवस्थापन मंडळातील सदस्य तसेच व्यवस्थापकीय संचालिका अपेक्षिता ठिपसे उपस्थित होते.





