Pune news : पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे ३५ वे अत्याधुनिक दालन अमनोरा मॉल, हडपसर येथे भव्य उद्घाटन !
१९५ वर्षांची विश्वासार्ह परंपरा जपत महाराष्ट्रासह देशभरातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या पु. ना. गाडगीळ आणि सन्स यांनी आज अमनोरा मॉल, हडपसर येथे आपल्या ३५ व्या दालनाचे भव्य उद्घाटन केले.

Pune news : – १९५ वर्षांची विश्वासार्ह परंपरा जपत महाराष्ट्रासह देशभरातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या पु. ना. गाडगीळ आणि सन्स यांनी आज अमनोरा मॉल, हडपसर येथे आपल्या ३५ व्या दालनाचे भव्य उद्घाटन केले.
अत्याधुनिक वास्तुरचना, प्रशस्त आणि आकर्षक अंतर्गत सजावट, जागतिक दर्जाचा ग्राहक अनुभव आणि दागिन्यांचा विस्तृत संग्रह यामुळे हे दालन ब्रँडच्या सर्वात आधुनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण शोरूमपैकी एक ठरणार आहे.
या नव्या दालनात पारंपरिक आणि आधुनिक अशा विविध शैलींतील सोन्याचे दागिने, नैसर्गिक हिऱ्यांचे दागिने, प्लॅटिनम, कुंदन, पोल्की, ब्रायडल कलेक्शन तसेच दैनंदिन वापरासाठी आकर्षक डिझाइन्स उपलब्ध आहेत.
उत्कृष्ट कारागिरी, शुद्धतेची हमी आणि ग्राहकांच्या अपेक्षांनुसार सर्वोत्तम खरेदीचा अनुभव देण्याच्या उद्देशाने या दालनाची संकल्पना साकारण्यात आली आहे.
या उद्घाटन सोहळ्यास प्रबोध अर्थवर्धिनीचे संचालक मोहन गुजराथी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडचे प्रमोटर व संचालक अजित गाडगीळ, डॉ. रेणू गाडगीळ आणि संचालक अमित मोडक यांच्या प्रमुख उपस्थितीत दालनाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
प्रमुख पाहुणे मोहन गुजराथी म्हणाले, “पु. ना. गाडगीळ आणि सन्स हे नाव म्हणजे विश्वास, गुणवत्ता आणि भारतीय परंपरेचे प्रतीक आहे. अमनोरा मॉलमधील हे अत्याधुनिक दालन पूर्व पुण्यातील ग्राहकांसाठी निश्चितच एक नवा आणि समृद्ध अनुभव ठरेल. या नवीन दालनाच्या माध्यमातून ब्रँड आणखी यशाच्या उंचीवर जाईल, असा मला विश्वास आहे. संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा.”
पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडचे संचालक अमित मोडक म्हणाले, “ग्राहकांना केवळ दागिने नव्हे, तर एक संस्मरणीय खरेदी अनुभव देणे हे आमचे ध्येय आहे.
अमनोरा मॉलमधील हे ३५ वे दालन आधुनिक डिझाइन, दागिन्यांचा विस्तृत संग्रह आणि उत्कृष्ट सेवेमुळे ग्राहकांसाठी एक प्रीमियम ज्वेलरी डेस्टिनेशन ठरेल. १९५ वर्षांचा विश्वास आणि आधुनिकतेचा संगम अनुभवण्यासाठी आम्ही सर्व ग्राहकांचे मनःपूर्वक स्वागत करतो.”
पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडचे प्रमोटर व संचालक अजित गाडगीळ म्हणाले, “१९५ वर्षांपूर्वी रुजलेला विश्वासाचा वारसा आजही प्रत्येक ग्राहकाच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून अधिक समृद्ध होत आहे. अमनोरा मॉलमधील हे ३५ वे दालन आमच्या विस्ताराच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.
परंपरा, शुद्धता, उत्कृष्ट कारागिरी आणि आधुनिक ग्राहक अनुभव यांचा सुंदर संगम घडवत आम्ही पुढील अनेक पिढ्यांपर्यंत विश्वासाची ही परंपरा अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
भव्य उद्घाटनानिमित्त आकर्षक ऑफर्स :
अमनोरा मॉल येथील नव्या दालनाच्या उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी विशेष आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत.
सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर (Making Charges) ५०% पर्यंत सूट
हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर (Making Charges) १००% पर्यंत सूट
या मर्यादित कालावधीतील ऑफर्सचा लाभ घेऊन ग्राहकांना आपल्या आवडीचे दागिने अधिक आकर्षक किमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
पु. ना. गाडगीळ आणि सन्स यांनी गेल्या १९५ वर्षांत गुणवत्ता, शुद्धता, उत्कृष्ट कारागिरी आणि ग्राहकांचा विश्वास या मूल्यांच्या बळावर भारतीय सराफा क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अमनोरा मॉलमधील हे ३५ वे दालन पूर्व पुण्यातील ग्राहकांसाठी जागतिक दर्जाचा ज्वेलरी अनुभव उपलब्ध करून देणार असून, ब्रँडच्या विस्ताराच्या वाटचालीतील आणखी एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे.





