हडपसर : मेडिकल असोसिएशन अध्यक्षपदी डॉ. राहुल झांजुर्णे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
हडपसर – हडपसर मेडिकल असोसिएशनच्या नोबल भवन येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अस्थिरोग तज्ज्ञ, सायकलपटू व इंटर नॅशनल आर्यनमॅन डॉ. राहुल नवनाथ झांजुर्णे यांची असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
मावळते अध्यक्ष डॉ. चंद्रकांत हरपळे यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्याकडे पदभार सोपवला. नियोजित अध्यक्ष म्हणून डॉ. मनोज कुंभार यांची निवड करण्यात आली. साधारण १२५० डॉक्टर सदस्य असलेल्या व ८०-जी नामांकन प्राप्त या संस्थेच्या निवडणुकीचे कामकाज निवडणूक अधिकारी म्हणून डॉ. प्रशांत चौधरी आणि डॉ. अशोक जैन यांनी पाहिले.
डॉ. झांजुर्णे यांनी मनोगत व्यक्त करताना आगामी वर्षात त्यांनी संकल्प केलेल्या सभासद व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी असलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रिडा व वैद्यकीय कल्याणकारी योजनांची माहिती मांडली. संघटनेच्या संघटन, सेवा, समर्पण, या ब्रिदाला कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.