पुणे विभागात करोनामुक्‍तीचे प्रमाण 94.21%

वाढत्या मृत्यू दरामुळे काहीशी चिंता; सध्या केवळ 15 हजार 352 रुग्णांवर उपचार सुरू

पुणे – पुणे विभागातील सक्रिय बाधितांची संख्या झपाट्याने घटली आहे. सध्या केवळ 15 हजार 352 रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 9 हजार 373, सातारा 2 हजार 456, सोलापूर 2 हजार 199, सांगली 653 तर कोल्हापूरमध्ये 671 सक्रिय बाधित आहेत.

एकीकडे बाधित आणि सक्रिय बाधितांची संख्या घटत असली तरी मृत्युचा दर कमी होत नसल्याने प्रशासनाची चिंता वाढलेलीच आहे. दरम्यान, विभागातील करोनामुक्‍तीचे प्रमाण 94.21, तर मृत्युचे प्रमाण 2.82 टक्‍के आहे.

पुणे विभागातील एकूण 5 लाख 15 हजार 764 बाधितांपैकी 4 लाख 85 हजार 879 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात आहे. दरम्यान, एक महिन्यांपासून कमी झालेली बाधित संख्या पुन्हा वाढण्याची भिती आकडेवरीवरून दिसून येते.

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 77 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 622, सातारा जिल्ह्यात 175, सोलापूर जिल्ह्यात 185, सांगली जिल्ह्यात 71 तर कोल्हापूर जिल्ह्यात 24 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.