उंडवडी कप येथे पेट्रोल पंपाचे उद्घाटन
बारामती – बारामती बाजार समितीने भुसार, फळे व भाजीपाला, जनावरे बाजार, चिंच व रेशीम मार्केटमधील उत्पन्नाबरोबर आता पेट्रोल पंपाची उभारणी करून उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण केला आहे. बारामती बाजार समितीचे चार पेट्रोल व डिझेल पंप व दोन सीएनजी पंप आहेत. समित्यांनी फक्त मार्केट फी वर अवलंबुन न राहता असे वेगवेगळे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केले पाहिजेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या उंडवडी क.प. येथील पेट्रोल पंपाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी श्री सोमेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तम जगताप, बाळासाहेब तावरे, संभाजी होळकर, विश्वास देवकाते, दत्तात्रय येळे, सचिन सातव, विक्रम भोसले, पोपटराव गावडे, सुशांत जगताप, भरत खैरे, प्रतापराव पागळे, वसंतराव घनवट, सरपंच रूपाली जराड, समीर बनकर, अशोकराव साळुंके, अनिल हिवरकर,
संपतराव जगताप, प्रकाश तावरे, समितीचे सदस्य दत्तात्रय तावरे, विनायक गावडे, युवराज देवकाते, विश्वास आटोळे, सतिश जगताप, बापुराव कोकरे, प्रतिभा परकाळे, शोभा कदम, शुभम ठोंबरे, विशाल भोंडवे, अरूण सकट, संतोष आटोळे, नितीन सरक, सहाय्यक निबंधक मिलिंद टांकसाळे, सईद बागवान, सुभाष चांदगुडे उपस्थित होते.
सचिव अरविंद जगताप म्हणाले की, बाजार समितीने एचपी कंपनीचा ए टाईप पेट्रोल पंपाची उभारणी केली आहे. त्यामुळे ग्राहकांना शुद्ध पेट्रोल व डिझेल मिळणार आहे. यामुळे परिसरातील मुलांना रोजगार उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. उपसभापती निलेश लडकत यांनी आभार मानले.
सुपे नवीन उपबाजार येथे शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवित आहे. सुपे व परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होत असल्याने नवीन उपबाजार आवारात स्वतंत्र कांदा मार्केटची उभारणी करण्यात येणार आहे. कांदा मार्केट हब करणेचा समितीचा मानस असल्याने परिसरातील शेतक-यांना याचा फायदा होणार आहे. विविध सुविधा व दुरगामी प्रकल्प राबविणेस बारामती बाजार समिती सतत कटिबद्ध राहील.
-सुनील पवार, सभापती -बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती