Pune Crime : दुसर्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रेयसीला बेल्टने मारहाण; 30 वर्षीय प्रियकराला अटक

पुणे – दुसर्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून प्रेयसीला बेल्टने मारहाण करणार्या प्रियकराला उत्तमगनर पोलिसानी अटक केली. सुशांत काबदुले (वय 30, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका 30 वर्षाच्या तरुणीने उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना चार दिवसापुर्वी कुडजे परिसरात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचे प्रेमसंबंध आहेत. आपल्या प्रेयसीचे इतर मुलांबरोबर प्रेमसंबंध आहेत, असा आरोपीला संशय होता. कुडजे येथील हॉटेल एका दोघे मंगळवारी दुपारी साडेचार वाजता भेटले होते. त्यावेळी सुशांत याने फिर्यादी हिला तुझे माझ्याशिवाय इतर मुलांबरोबर प्रेमसंबंध आहेत, असा संशय घेतला.
त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा सुशांत याने फिर्यादीला हाताने तोंडावर, डोक्यात मारहाण केली. कमरेचा बेल्ट काढून पाठीवर मारुन जखमी केले. त्याच्या या मारहाणीमुळे फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. उत्तमनगर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करुन सुशांत काबदुले याला अटक केली आहे.





