पुणे – साेने खरेदी करुन नांदेड ते पुणे प्रवास करुन आलेल्या एका सराफाच्या व्यक्तीला पुण्यातील स्वारगेट परिसरातील वेगासेंटर जवळ ट्रॅव्हलसच्या थांब्या जवळील फुटपाथवर कार मधून चार आलेल्या अनाेळखी इसमांनी पकडले. त्यास अॅन्टी कऱप्शनचे अधिकारी असल्याचे सांगून शस्त्राचा धाक दाखवून संबंधित भामटयांनी १७ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज व बॅग लंपास केल्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत स्वारगेट पाेलीस ठाण्यात मधुरम सत्यनारायण साेनी (वय-२७,रा.नांदेड) यांनी पाेलीसांकडे चार अनाेळखी इसमांविराेधात फिर्याद दिली आहे. सात मार्च राेजी सकाळी साडेसहा वाजण्याचे सुमारास साेनी यांचा कर्मचारी शंकर भालेराव हा साेने खरेदी करता नांदेड ते पुणे असा प्रवास करुन आले हाेते. स्वारगेट परिसरात ते थांबले असताना, काळया रंगाचे कार मधून त्याठिकाणी चार अनाेळखी व्यक्ती येऊन त्यांनी शंकर यांच्या खांद्यावर हात टाकुन त्यांना अॅन्टी करप्शनचे अधिकारी असल्याचे सांगितले.
त्यानंतर पिस्टल सारख्या शस्त्राचा धाक दाखवून जबरदस्तीने त्यांना कार मध्ये बसवून त्यांचे ताब्यातील १७ लाख ५८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चाेरुन नेला आहे. याबाबत पुढील तपास स्वारगेट पाेलीस करत आहे.