Pune Crime : पाय लागल्यामुळे झालेल्या भांडणातून तरूणावर वार; धनकवडीतील घटना
Updated On:

पुणे – पाय लागल्यामुळे जाब विचारल्याचा राग आल्यामुळे दोघा जणांनी तरूणाला मारहाण करून कोयत्याने वार केल्याची घटना रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास धनकवडीत घडली. हल्ल्यात कल्पेश देशमुख (वय २६, रा. बालाजीनगर, धनकवडी) जखमी झाले आहेत.
याप्रकरणी त्यांचा मित्र अरूण साळुंखे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पेश आणि अरूण मित्र असून काल रात्री साडेबाराच्या सुमारास ते धनकवडीतील ओसवाल इमारतीसमोर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तेथे आलेल्या एका तरूणाचा पाय कल्पेशला लागला. त्यामुळे त्यांनी संबंधिताला विचारपूस केली.
त्याचा राग आल्यामुळे आरोपीने साथीदाराला बोलावून कल्पेशवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक युनूस मुलाणी तपास करीत आहेत.





