पुणे – पती मोबाईल मधील अश्लील चित्रफीत दाखवून अत्याचार करायचा तसेच पत्नीला विवस्त्र करून त्याची चित्रफीत तयार करणाऱ्या पती विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 12 एप्रिल 2015 ते आज पर्यंत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे पती पत्नी आहेत. त्यांना 5 वर्षांचा मुलगा आहे. पती नेहमी फिर्यादी यांना मोबाईल मधील अश्लील चित्रफीत दाखवून त्याप्रमाणे अत्याचार करत असे. तसेच पत्नीला विवस्त्र करून नाचायला लावत असे. जर तीने याचा विरोध केला तर ही चित्रफीत समाज माध्यमावर टाकायची धमकी देत असे.
फिर्यादी यांना रात्री अपरात्री फोन करून शिवीगाळ करून मारून टाकण्याची धमकी देत असे. तसेच फिर्यादी या डिसेम्बर 2015 मध्ये माहेरी गेल्या होत्या. त्यावेळी पतीने अतिप्रसंग करण्याचा प्रयन्त केला. तसेच फिर्यादीच्या पतीने मेव्हणीच्या ऑफिस मध्ये पत्र पाठवून ती रेक्स रॅकेट चालवत असल्याचे सांगून बदनामी केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्ना वाघमारे करत आहेत.