Pune News : ऐरो स्पेस मॉलमधील बारवर गुन्हे शाखेचा छापा; व्यवस्थापक, डीजेसह आठ जणांवर गुन्हा
Pune News : पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ऐरो स्पेस मॉलमधील 'द हाऊस कम्यून बार अँड ईटरी' या बारवर गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे ३:२० वाजेच्या सुमारास धडक कारवाई केली.

Pune News : विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऐरो स्पेस मॉल येथील ‘द हाऊस कम्यून बार अँड ईटरी’ या बारवर गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. ९) पहाटे सुमारे ३ वाजून २० मिनिटांनी छापा टाकून नियमबाह्य पद्धतीने बार सुरू असल्याचे उघडकीस आणले. या प्रकरणी प्रायोजक, व्यवस्थापक, डीजे, मालक व कर्मचाऱ्यांसह आठ जणांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. (Pune News)
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाईवेळी बारमध्ये एकूण ८९ ग्राहक उपस्थित होते. त्यामध्ये ६३ पुरुष व २६ महिलांचा समावेश होता. तपासादरम्यान बार नियमांचे उल्लंघन करून सुरू असल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम, प्रोहिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगारेट्स ॲक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. (Pune News)
या प्रकरणातील आरोपींमध्ये सुमित गोटे (स्पॉन्सर), नूर हुसैन शेख (व्यवस्थापक), सोनाली पंडित (डीजे), मंगेश धिमधीमे (मालक), अनिकेत किर, सुनीता वर्मा, अनंत गायकवाड आणि शानूर काजी (कर्मचारी) यांचा समावेश आहे. (Pune News)
कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे १ लाख ६७ हजार किमतीचा मद्यसाठा तसेच ७५ हजार किमतीची साऊंड सिस्टीम असा एकूण २ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत. (Pune News)
Pune News : बनावट भरती रॅकेटची चौकशी करा; कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा : मनसेची मागणी





