Crime News : प्रेयसीच्या होकारासाठी तरुण चढला थेट टॉवरवर; तासभर हायव्होल्टेज ड्रामा
Crime News : चित्रपटांमधील ‘शोले’ स्टाईल प्रेमाच्या नाट्याची हुबेहूब पुनरावृत्ती सांगली जिल्ह्यातील कुपवाड शहरात पाहायला मिळाली.

Crime News : प्रेमासाठी तरुण-तरुणी काय करतील याचा काही नेम नाही. चित्रपटांमध्ये पाहायला मिळणाऱ्या ‘शोले’ स्टाईल प्रेमाच्या नाट्याचीच पुनरावृत्ती सांगलीतील कुपवाड शहरात पाहायला मिळाली. प्रेयसीने प्रेमाचा होकार द्यावा, या मागणीसाठी एका तरुणाने थेट मोबाईल टॉवरवर चढून ठिय्या मांडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. (Crime News)
कुपवाड शहरातील एका परिसरात अचानक मोबाईल टॉवरवरून तरुणाच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. नागरिकांनी आवाजाच्या दिशेने पाहिले असता एक तरुण टॉवरच्या टोकावर जाऊन बसल्याचे दिसून आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. (Crime News)
‘माझी प्रेयसी इथे येऊन प्रेमाचा होकार देत नाही, तोपर्यंत मी खाली उतरणार नाही,’ अशी भूमिका या तरुणाने घेतली होती. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. (Crime News)
तरुण टॉवरवर चढल्याची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवले. त्यानंतर कुपवाड एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या अनपेक्षित प्रकारामुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती आणि प्रशासनाचीही चांगलीच तारांबळ उडाली. (Crime News)
पोलिसांनी टॉवरवर असलेल्या तरुणाशी संवाद साधत त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सुमारे तासभर चाललेल्या या हायव्होल्टेज ड्रामानंतर अखेर तरुण खाली उतरला. (Crime News)
खाली उतरल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रेमाचा होकार मिळवण्यासाठी तरुणाने केलेल्या या ‘शोले’ स्टाईल प्रकाराची सध्या कुपवाड शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. (Crime News)
Crime News : पुणे शहर पोलिसांची धडक कारवाई; सोनसाखळ्यांची लूट करणारी टोळी 12 तासात जेरबंद





