Pune News : पुण्याला ‘वर्ल्ड बुक कॅपिटल’ बनवण्यासाठी पावले; बाणेर येथे ‘एनबीटी’च्या पश्चिम विभागीय केंद्राचा शुभारंभ
Pune News : पुण्याला जागतिक स्तरावर ‘वर्ल्ड बुक कॅपिटल’ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे (एनबीटी) पश्चिम विभागीय केंद्र अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

Pune News : पुण्याला जागतिक स्तरावर ‘वर्ल्ड बुक कॅपिटल’ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे (एनबीटी) पश्चिम विभागीय केंद्र अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. (Pune News)
बाणेर येथील गणराज चौकाजवळ उभारण्यात येणाऱ्या या एनबीटीच्या नवीन केंद्राच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, एनबीटीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, एनबीटीचे विश्वस्त व पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, प्रसेनजित फडणवीस आदी उपस्थित होते. (Pune News)
युवराज मलिक आणि प्रा. मिलिंद मराठे यांनी स्पष्ट केले की, नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणारे हे केंद्र देशातील सर्वोत्तम विभागीय केंद्रांपैकी एक असेल. या केंद्रात दरवर्षी अडीच लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट असून, यात विशाल वाचन कक्ष, २५० आसनक्षमतेचे मोफत सभागृह, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा, बुक पब्लिशिंग अभ्यासक्रम आणि पुस्तकांच्या प्रसारासाठी विशेष बसेस उपलब्ध असणार आहेत. (Pune News)
पांडे म्हणाले, पुणे पुस्तक महोत्सवाला जागतिक स्तरावरील कॅलेंडर इव्हेंट बनविण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता एनबीटीचे पश्चिम विभागीय कार्यालय पुण्यात सुरू होत असून, पुढील लक्ष्य पुण्याला ‘वर्ल्ड बुक कॅपिटल’ बनविण्याचे आहे. त्यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले. प्रसेनजित फडणवीस यांनी आभार मानले. (Pune News)





