Koynanagar News : मंत्री शंभूराज देसाई व उदय सामंत यांच्यावर विश्वास; मनोज जरांगे यांचे विधान
Koynanagar News : मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर वारंवार टीका केली असली, तरी काही निवडक मंत्र्यांवर मात्र त्यांनी आपला पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.

Koynanagar News : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेमध्ये मंत्री शंभूराज देसाई व उदय सामंत यांच्याविषयी व्यक्त केलेल्या विश्वासाचा फोनवरील संवाद सध्या पाटण तालुक्यात व्हायरल होत आहे. (Koynanagar News)
जरांगे पाटील यांनी अनेक वेळा सरकारवर टीका केली असली तरी निवडक नेत्यांवर त्यांनी विश्वास दाखवला आहे. त्यामध्ये शंभूराज देसाई यांचे नाव ठळकपणे पुढे येते. (Koynanagar News)
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या फोनवरील संवादामुळे या संपूर्ण समीकरणाला आणखी वेग आला आहे. हा संवाद पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यातून जरांगे पाटील यांची भूमिका आणि सरकारशी असलेला संवाद स्पष्ट होत आहे. (Koynanagar News)
या घडामोडीत ‘शंभूराज देसाई फॅक्टर’ अधिक ठळकपणे पुढे येतो. ते विश्वासाचे केंद्रबिंदू बनले आहेत. पाटण तालुक्यात व्हायरल झालेल्या फोन संभाषणामुळे स्थानिक पातळीवरही चर्चेला उधाण आले आहे. (Koynanagar News)
Koynanagar News : कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाजांना पाणी टेकले; साठा ७२.६१ टीएमसीवर





