Nevasa News : ‘एस कॉर्नर’ ठरला अपघाताचा स्पॉट; नेवासा बुद्रुकजवळ अपेरिक्षा पलटी; सात जण गंभीर जखमी
Nevasa News : नेवासा-श्रीरामपूर राज्य मार्गावरील नेवासा बुद्रुक येथील 'एस कॉर्नर' जवळ शनिवारी (८ ऑगस्ट २०२६) दुपारी दोन वाजेच्या सुमारास एक भीषण रस्ते अपघाताची घटना घडली.

Nevasa News : नेवासा-श्रीरामपूर राज्य मार्गावरील नेवासा बुद्रुक येथील एस कॉर्नरजवळ शनिवारी (दि. ८) दुपारी दोनच्या सुमारास अपघाताची घटना घडली. श्रीरामपूरहून नेवाशाकडे येणारी अपेरिक्षा वळणावर अचानक रस्त्यावरून खाली गेल्याने पलटी झाली. या अपघातात रिक्षातील सात जण गंभीर जखमी झाले आहेत. (Nevasa News)
अपघाताची माहिती मिळताच नेवासा फाटा येथील रुग्णवाहिका चालक विकास निपुंगे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. (Nevasa News)
या अपघातात भिमराज हरिभाऊ गायकवाड, मिराबाई दिनकर खरे, मिनाबाई सुरेश खरे, शिवाजी नितीन खरे आणि कलावती मोहन शिंदे (सर्व रा. श्रीरामपूर) तसेच संगीता सुभाष राऊत आणि कल्याणी महेश राऊत (रा. बेलपांढरी) हे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपेरिक्षा अचानक रस्त्याच्या खाली गेल्यानंतर पलटी झाली. अपघात नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Nevasa News)
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलिसांनी तपास सुरू केला असून अपघाताच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Nevasa News)





