Pro Kabaddi League 2023-24 :- प्रो-कबड्डी लीगमध्ये पुण्यात शुक्रवारी झालेल्या सामन्यात यु मुंम्बा संघाने पाटणा पायरट्सचा 42-40 असा अवघ्या दोन गुणांनी पराभव केला आणि 4 सामन्यांमध्ये दुसरा विजय नोंदवला. 3 वेळा माजी चॅम्पियन असलेल्या पाटणा पायरेट्सचा हा सलग दुसरा पराभव आहे. या सामन्यात दोन्ही संघांची जोरदार चुरस पाहायला मिळाली. मात्र, यु मुंम्बाच्या अमीरमहंमद जफरदनिशने अफलातून खेळ करत सामना पाटणाच्या हातून काढून घेतला.
इसे कहते हैं ज़ोरदार, ज़बरदस्त और जानदार मुकाबला 💥
मुम्बा की दूसरी जीत पर क्या कहना है मुंबई वालों? 🗣
#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKL #PKLSeason10 #HarSaansMeinKabaddi #MUMvPAT #UMumba #PatnaPirates pic.twitter.com/IJXgGOCW5V— ProKabaddi (@ProKabaddi) December 15, 2023
पहिल्या सत्रात खरेतर पाटणा संघाने 21-18 अशी आघाडी घेतली होती. त्यावेळी त्यांच्या सचिनने 12 गुण मिळवताना वर्चस्व राखले होते. त्याला एम. सुधाकरने 7 गुण मिळवत चांगली साथ दिली. मात्र, दुसरे सत्र सुरु झाले आणि सामन्याचे चित्रच पालटले. अमीरमहंमदने पाटणा संघाच्या सर्वोत्तम पकडी केल्या. त्याला व्ही. विश्वनाथ व गुमा सिंग यांनी प्रत्येकी 8 रेड गुण मिळवत सुरेख साथ केली.
अखेरच्या काही मिनिटात मोक्याच्या क्षणी गुमानव अमीरमहंमदने केलेल्या खेळाच्या जोरावर यु मुंम्बाने बाजी मारली.
यंदाच्या प्रो-कबड्डी लीगचा पहिला टप्पा अहमदाबादला सुरु झाला. त्यानंतर बंगळुरुचा दुसरा टप्पाही पार पडला. आता शुक्रवारपासून तिसरा टप्पा पुण्यात सुरु झाला.
गेल्या दोन मोसमांपासून या स्पर्धेला चाहत्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, यंदाच्या मोसमापासून हे चित्र बदलले. अहमदाबाद, बंगळुरु व पुणे या तीन ठिकाणी मात्र, ईनडोअर मैदाने पूर्ण भरल्याचे दिसत आहे. अहमदाबादनंतरच्या बंगळुरू फेरीत तर चाहत्यांची अलोट गर्दी दिसली. थोड्याफार प्रमाणात पुण्यातही तीच परिस्थिती दिसून आली.