बंगळुरू :- प्रो-कबड्डी लीगमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात तमिळ थलैवाज संगाने तेलगू टायटन्सवर ३८-३६ असा अवघ्या २ गुणांनी विजय मिळवला व स्पर्धेत आगेकूच केली. या दोन्ही संघांमध्ये पहिल्या क्षणापासून गुणांची चुरस सुरु होती. अखेर अखेरच्या काही मिनिटात तमिळ संघाने केलेला बचाव निर्णायक ठरला व त्यांनी निसटता परंतू थरारक विजय मिळवला.
ஜெயிச்சிட்டோம் மாறா 🔥
இரண்டாவது வெற்றியை கைப்பற்றியது தமிழ் தலைவாஸ் 😍
தொடர்ந்து பாருங்க #PKLSeason10 #Prokabaddi நேரலை#ProKabaddiLeague #PKL #HarSaansMeinKabaddi #CHEvTT #TamilThalaivas #TeluguTitans pic.twitter.com/LINJbbEZHd
— ProKabaddi (@ProKabaddi) December 13, 2023
या सामन्यात पहिले सत्र सुरु झाले तेव्हा खरेतर तेलगू संघाचा वरचश्मा होता. त्यांनी सुरुवातीला आक्रमक खेळ केला. त्यावेळी तमिळ संघानेही तोडीसतोड खेळ करत चांगली लढत दिली. तरीही पहिल्या १५ मिनिटांत तेलगू संघाने १३-१२ अशी एक गुणाची आघाडी घेतली होती. यावेळी तमिळ संघाच्या नरेंद्र होशियार व साहिल सिंग यांनी जोरदार मुसंडी मारताना पहिले सत्र संपताना २०-१७ अशी निसटती आघाडी मिळवली.
दुसरे सत्र सुरु झाल्यावर तर तेलगू संघाच्या प्रत्येक डावपेचावर तमिळ संघाने वर्चस्व राखले. अजिंक्य पवार, जतीन फोगट व जतिन सिंग यांनी प्रत्येकी ४ गुण मिळवले. त्यांनी सर्वबादचे २ गुणही प्राप्त करत तेलगू संघावर दडपण आणले. त्यांना आक्रमण करताना चढाई यशस्वी करता आली नाही. होशियारने अखेरच्या काही मिनिटात तेलगूची व्युहरचना नेस्तनाबूत करत पुन्हा एकदा आघाडी घेतली.
#PKLSeason10 (#BENvPAT Match 20) : बंगालची पाटणावर दणदणीत मात…
तेलगु संघानेही निकराचे प्रयत्न केले परंतू त्यांना यश आले नाही. तेलगु संघाच्या पवन शेरावत व रॉबीन चौधरी यांनी प्रत्येकी ७ तर संजीवी एस यांने ६ गुणांची कमाई करताना सामना रंगतदार स्थितीत आणला होता. यावेळी दोन्ही संघांना विजयाची संधी होती. मात्र, तमिळ संघाच्या खेळाडूंनी सागर व मोहितच्या यशस्वी चढायांच्या जोरावर अवघ्या २ गुणांनी विजय साकार केला. तेलगू संघाकडे त्यांच्या आक्रमक खेळासाठी उत्तरच नव्हते.