Pro Kabaddi 2024 (Match 128) | हरियाणा स्टीलर्सनं रचला इतिहास, 16व्या विजयासह थेट उपांत्य फेरीत मारली धडक…

Pro Kabaddi 2024 (Haryana Steelers vs U-Mumba) : प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या मोसमातील पहिला उपांत्य फेरीचा संघ निश्चित झाला आहे. हरियाणा स्टीलर्सने जबरदस्त कामगिरी करून थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहे. रविवारी झालेल्या सामन्यात हरियाणा संघाने यू मुम्बाचा 47-30 असा एकतर्फी पराभव केला. यासह या पीकेएल 11 व्या हंगामात उपांत्य फेरी गाठणारा हरियाणा आता पहिला संघ बनला आहे.
धाकड़ छोरों ने यू मुंबा को हराकर सेमीफाइनल में बनाई जगह 🔥💙 #ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #HaryanaSteelers #UMumba pic.twitter.com/JjG3mmi6Zc
— ProKabaddi (@ProKabaddi) December 22, 2024
दुसरीकडे, प्लेऑफमध्ये थेट प्रवेशासाठी मुंबाला या सामन्यातून एक गुण मिळवणे गरजेचे होते, परंतु ते अपयशी ठरले. आता, त्यासाठी त्यांना आता पुढील सामन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. हरियाणा स्टीलर्सचे आता 84 गुण झाले आहेत. साखळी टप्प्यात त्यांनी एकूण 22 सामने खेळले, त्यापैकी त्यांनी 16 सामने जिंकले आणि 6 सामने गमावले. गुणतालिकेत संघ अव्वल स्थानावर राहिला.
हरियाणाच्या विजयात शिवम पटारे (14) याच्याशिवाय डिफेंसमध्ये राहुल सेतपाल (5) आणि मोहम्मदरेझा शदलू (5) यांनी महत्वाची भूमिका बजावली. मुंबासाठी सतीशने रेडमध्ये (चढाई) नऊ गुण घेतले तर सुनीलने डिफेंसमध्ये( बचाव) चार गुण घेतले. हरियाणाने 8 विरुद्ध 17 गुणांच्या जोरावर तीन ऑल आऊट घेत बचावात आपले वर्चस्व सिद्ध केले.
Pro Kabaddi 2024 (Match 127) | परदीप नरवाल पुन्हा फ्लॉप, बेंगळुरू बुल्सचा सलग पाचवा पराभव…
प्रो कबड्डी लीगच्या 10 व्या हंगामात हरियाणा स्टीलर्सने अंतिम फेरी गाठली होती. पीकेएलच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही पहिलीच वेळ होती. मात्र, त्यावेळी त्याला पुणेरी पलटणकडून पराभव स्वीकारावा लागला आणि तो उपविजेता ठरला. यावेळी हरियाणाने आणखी चांगला खेळ दाखवत थेट उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. हरियाणाने पीकेएलच्या इतिहासात प्रथमच थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत हरियाणा आता 27 डिसेंबरला खेळताना दिसणार आहे. आता प्रथमच PKL ट्रॉफी जिंकण्यापासून संघ फक्त 2 पावले दूर आहे. त्यांना उपांत्य आणि अंतिम सामन्यात विजय मिळवावा लागेल.





