Pro Kabaddi League 2024 (Semi-Final 2) : तीन वेळचा चॅम्पियन पाटणा पायरेट्स पाचव्यांदा अंतिम फेरीत, विजेतेपदासाठी स्टीलर्सशी भिडणार…

Pro Kabaddi League 2024 (Semi-Final 2, Dabang Delhi KC vs Patna Pirates) : प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील दोन माजी विजेते संघ पीकेएल 2024 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत आमनेसामने आले होते. यामध्ये प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या पाटणा पायरेट्सने या मोसमातील नंबर 2 संघ दबंग दिल्लीचे स्वप्न भंग केलं. दुसऱ्या उपांत्य फेरीत पाटणाने दिल्लीचा 32-28 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
𝐒𝐄𝐀𝐒𝐎𝐍 𝟑, 𝟒 & 𝟓 ✅ • 4th 🏆 𝕝𝕠𝕒𝕕𝕚𝕟𝕘? 👀#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #PKLPlayoffs #DabangDelhiKC #PatnaPirates pic.twitter.com/kEfEnzlxSq
— ProKabaddi (@ProKabaddi) December 27, 2024
पाटणा पायरेट्स साठी या सामन्यात देवांकने सर्वाधिक 8 गुण घेतले तर बचावात शुभम शिंदेने 5 टॅकल गुण घेतले. दुसरीकडे दबंग दिल्ली केसीसाठी आशु मलिकने 9 रेड पॉइंट घेतले तर बचावात योगेशने 4 टॅकल पॉइंट घेतले.
तत्पूर्वी, या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्लीने गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. पण दिल्लीच्या संघाला उपांत्य फेरीत साखळी फेरीतील कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही.
दुसरीकडे, तीन वेळा चॅम्पियन असलेल्या पाटणा पायरेट्सने एलिमिनेटर सामन्यात यू मुम्बाचा 31-23 असा पराभव करून चौथ्या विजेतेपदाच्या दिशेने पाऊल टाकले. पाटणा संघाने 3,4 आणि 5 हंगाम जिंकले आहेत. आता त्याची नजर चौथ्या विजेतेपदावर आहे, ज्यासाठी 29 डिसेंबरला त्याचा सामना टेबल टॉपर हरियाणा स्टीलर्सशी होणार आहे.





