Pro Kabaddi League 2024 (Eliminator 2) | युपी योद्धाजनंतर पटना पायरेट्स उपांत्य फेरीत दाखल, यू मुम्बावर केली मात…

Pro Kabaddi League 2024 (Eliminator 2, Patna Pirates vs U Mumba) : पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये गुरुवारी खेळल्या गेलेल्या प्रो कबड्डी लीगच्या 11व्या मोसमातील एलिमिनेटर-2 सामन्यात तीनवेळचा चॅम्पियन पटना पायरेट्स संघाने यू मुंबाचा 31-23 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे.
When the Pirates arrive, they tend to find the treasure 🔥🤩#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #PKLPlayoffs #PatnaPirates #UMumba pic.twitter.com/OT7NgpWg4I
— ProKabaddi (@ProKabaddi) December 26, 2024
पाटणाला आता उपांत्य फेरीत दबंग दिल्ली केसीचा सामना करावा लागणार आहे. पटना संघाने 17 व्यांदा प्लेऑफ खेळताना 12 वा विजय संपादन केला आहे. पाटणा संघ हा सर्वाधिक सेमीफायनल खेळणारा संघ आहे.
पटना पायरेट्सच्या या शानदार विजयात अयान आणि देवांकने प्रत्येकी 8 रेड पॉइंट घेतले. डिफेंसमध्ये (बचाव) गुरदीपने 5 टॅकल पॉइंट घेतले. दुसरीकडे यू मुम्बासाठी जफरदानेशने सर्वाधिक 6 रेड पॉइंट घेतले आणि डिफेंसमध्ये(बचाव)लोकेशने तीन टॅकल पॉइंट घेतले.
सेमीफायनल सामने : 27 डिसेंबर 2024
उपांत्य फेरी 1 : हरियाणा स्टीलर्स विरुद्ध यूपी योद्धाज – रात्री 8:00 (IST) – बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे
उपांत्य फेरी 2 : दबंग दिल्ली केसी विरुद्ध पटना पायरेट्स – रात्री 9:00 (IST) – बालेवाडी क्रीडा संकुल, पुणे





