Pro Kabaddi 2024 (Match 132) | प्लेऑफचा सहावा संघ ठरला, यू मुम्बाची Playoffs मध्ये दणदणीत एन्ट्री…

Pro Kabaddi 2024 (U Mumba vs Bengal Warriorz) – प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामातील सहाव्या प्लेऑफसाठी संघ निश्चित करण्यात आला आहे. यू मुम्बा संघाने आता अधिकृतपणे प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. यू मुम्बाने हंगामातील शेवटच्या साखळी सामन्यात बंगाल वॉरियर्सचा 36-27 असा पराभव केला आणि यासह प्लेऑफमधील स्थान निश्चित केलं.
#UMumba ची प्लेऑफ्स मध्ये दणदणीत एन्ट्री 💪🧡#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #BengalWarriorz pic.twitter.com/2ce5HiDoOT
— ProKabaddi (@ProKabaddi) December 24, 2024
यू मुम्बाने अनेक हंगामानंतर यावेळी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. प्लेऑफमधील त्यांचे स्थान आधीच निश्चित झाले होते, आज ते औपचारिकपणे निश्चित झाले. यू मुम्बा संघ साखळी फेरीच्या अखेरच्या सामन्यानंतर 71 गुणासंह पाचव्या स्थानावर राहिला. यू-मुम्बानं या हंगामात 12 विजय, 8 पराभव अन् 2 बरोबरीच्या सामन्यासह प्ले-आॅफमध्ये स्थान मिळवलं आहे.
यू मुम्बासाठी कर्णधार सुनील कुमारने या सामन्यात चमकदार कामगिरी करत आणखी एक हाय फाईव्ह लगावला. तसेच अजित चौहानने 6 तर अमीरमोहम्मद जफरदानेशने सर्वाधिक 7 गुण मिळवले. बंगाल वॉरियर्ससाठी, त्यांचा कर्णधार नितीश कुमारने चमकदार खेळ करत 8 गुण घेतले आणि प्रणय राणेने 12 गुण घेतले.
प्लेऑफमधील सर्व 6 संघही निश्चित….
यासह प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामातील लीग टप्प्यातील सामने संपले आहेत. यासह प्लेऑफमधील सर्व 6 संघही निश्चित झाले आहेत. यामध्ये हरियाणा स्टीलर्स (डायरेक्ट सेमी-फायनल), दबंग दिल्ली (थेट सेमी-फायनल), यूपी योद्धाज, पटना पायरेट्स, यू मुंबा, जयपूर पिंक पँथर्स या संघाचा समावेश आहे.





