मुंबई :– देशातील कबड्डी क्षेत्रातील सर्वात यशस्वी ठरलेल्या प्रो-कबड्डी लीगला लवकरच प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी झालेल्या लिलावात देशाचा स्टार कबड्डीपटू पवन शेरावत सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला तेलगू टायटन्सने तब्बल 2 कोटी 60 लाख रुपये या प्रचंड रकमेला आपल्या संघात घेतले. यापूर्वी देखील पवन प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
Pawan Kumar Sehrawat is a Telugu Titan!!
Yes you read it right! We get the High Flyer at 260.5 Lakhs, a #PKLPlayerAuction record!! 💪 🤩 🙌 @pawan_kumar17 #Titansquad #PawanSehrawat #ProKabaddi #PKLPlayerAuction #PKLSeason10 #TeluguTitans#AuctionPanga #Kabaddi #Auction pic.twitter.com/uwukKItG0o
— Telugu Titans (@Telugu_Titans) October 9, 2023
गेल्या वर्षी तमिल थलाइवाजने त्याच्यावर 2 कोटी 26 लाख रूपयांची बोली लावली होती. हा विक्रम मोहम्मदरेजा शादलूने मोडला. पुणेरी पलटनने त्याच्यावर 2 कोटी 35 लाखांची बोली लावली. पवनला आपल्या संघात स्थान देण्यासाठी सर्वच संघांमध्ये स्पर्धा झाली.
यूपी योद्धा, तेलुगू टायटन्स, हरियाणा स्टीलर्स व बंगळुरू बुल्स या संघांनी देखील मोठी बोली लावली होती. अखेर तेलुगू टायटन्सने बाजी मारली आणि 2 कोटी 60 लाखांची बोली लावत त्याला आपल्या संघात स्थान दिले.
शादलूची बेस प्राईज 30 लाख रूपये होती. यू-मुंबाने त्याच्यावर पहिली बोली लावली. त्यानंतर बंगाल वॉरियर्स, युपी योद्धा आणि गुजरात जायंट्सने देखील बोली लावली होती. शादलूला आपल्याकडे घेण्यासाठी सर्व संघांमध्ये चुरस लागली होती अखेर पुणेरी पलटनने त्याला आपल्या संघात घेतले.