मोठी बातमी…! प्रशांत कोरटकरची तुरुंगातून सुटका; कारागृहाबाहेर मिळणार पोलीस संरक्षण?

Prashant Koratkar : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केल्याप्रकरणी प्रमुख आरोपी प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर सत्र न्यायालायनं जामीन मंजूर केला असून आज (दि. ११) त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. जामीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोरटकरला जेलमधून बाहेर काढण्यात आलं आहे.
कोल्हापूर मधील कळंबा कारागृहाबाहेर पडल्यानंतर प्रशांत कोरटकरला पोलीस संरक्षणात जिल्ह्याबाहेर सोडले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. प्रशांत कोरटकरवर कोर्टाबाहेर दोन वेळा हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याच पार्शवभूमीवर त्याला पोलीस संरक्षण देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम
२४ फेब्रुवारी: मध्यरात्री १२:०८ वाजता कोरटकरने इंद्रजीत सावंत यांना फोन करून शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत धमकी दिली.
२५ फेब्रुवारी: सावंत यांच्या तक्रारीनंतर कोल्हापूरच्या राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
२७ फेब्रुवारी: कोरटकरने व्हिडीओ जारी करून माफी मागण्याचा प्रयत्न केला.
२८ फेब्रुवारी: कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला, परंतु पोलिसांचे म्हणणे ऐकण्याआधीच हा निर्णय झाला.
१८ मार्च: कोल्हापूर पोलिसांच्या अपीलनंतर जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळला.
२४ मार्च: तेलंगणातून अटक.
०९ एप्रिल : जमीन मंजूर
११ एप्रिल : कारागृहातून बाहेर
प्रशांत कोरटकर कोण आहे?
प्रशांत कोरटकर हा मुळचा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील रहिवासी. पण मागील अनेक वर्षांपासून त्याचे वास्तव चंद्रपूरमध्ये आहे. चंद्रपुरच्या सरदार पटेल महाविद्यालयातील जनसंवाद विद्या विभागात तासीका तत्वावर काम करतो. त्याला बड्या लोकांचे आकर्षण आणि सोशल मीडियाचे प्रचंड वेड असल्याचे दिसून येते. पोलीस अधिकाऱ्यांशी फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करायचा.




