प्रशांत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; जामीनासाठी करणार अर्ज?

Prashant Koratkar | छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्याने आता कोरटकरकडून तातडीने जामिनासाठी अर्ज केला जाण्याची शक्यता आहे. जामिनासाठी अर्ज केल्यानंतर या प्रकरणात सुनावणी होणार असून प्रशांत कोरटकरला जामीन मिळणार की न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर मंगळवारी (25 मार्च 2025) कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर 28 मार्चला कोरटकरला पुन्हा एकदा कोर्टात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज पुन्हा प्रशांत कोरटकरला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. Prashant Koratkar |
कोरटकरवर न्यायालयात वकिलानेच केला हल्ला
तब्बल महिना भरानंतर कोरटकरला तेलंगणातून अटक केल्यानंतर शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र यादरम्यान वकिल अमितकुमार भोसले यांनी कोरटकरवर हल्ला केला होता. कोरटकर दिसताच त्यांनी त्याला हाक मारली. शिवाजी महाराजांची बदनामी करतोस का? असा सवाल करत भोसले कोरटकरवर धावून गेले होते. ज्याचा व्हिडिओ देखील समोर आला होता.
कोरटकरच्या आलिशान गाडीचे गूढ समोर
दरम्यान, कोरटकरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यापैकी एका फोटोमध्ये तो आलिशान रोल्स रॉईस कारसोबत दिसत आहे. पिंपरी चिंचवडचे बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्याकडे ही रोल्स रॉईस गाडी असल्याचे समोर आले आहे. ही कार मुळशी तालुक्यातील तुषार कलाटे यांच्या फार्महाऊसवर उभी असल्याचे एका व्हिडीओमधून स्पष्ट झाले आहे. तसेच, WB-02-AB-123 या क्रमांकाच्या रोल्स रॉईस सोबत तुषार कलाटे यांचे काही फोटोही समोर आले आहेत. Prashant Koratkar |
हेही वाचा:





