कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) जामीन मंजूर करण्यात आला आहे. कोल्हापूर कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. कोरटकर (Prashant Koratkar) 5 दिवस पोलीस कोठडी आणि 10 दिवस न्यायालयीन कोठडीत असे एकूण 15 दिवस तुरुंगात होता. कोरटकरची जामिनासाठी सुरु होती धावाधाव महापुरुषांचा अवमान करणा-या प्रशांत कोरटकरच्या जामिनाचा मार्ग दिवाणी न्यायालयानं बंद केल्यानंतर कोरटकरनं जामीन मिळवण्यासाठी धावाधाव केली. प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी तातडीनं सत्र न्यायालयात अर्ज करण्यासाठी कागदपत्रं मिळवण्यासाठी बरीच धावाधाव केली. प्रशांत कोरटकरला अटक केल्याच्या पहिल्या दिवसापासून प्रशांत कोरटकर कोठडी टाळण्याचा प्रयत्न करत होता. हे पण वाचा : Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला ‘या’ 5 जणांनी मदत केली; पोलीस तपासात नवी माहिती समोर फरार असताना तो अटकपूर्वसाठी धडपड करत होता. अटक झाल्यानंतरही त्याच्या वकिलांनी पोलीस कोठडी देऊ नये असा युक्तिवाद केला. कोर्टानं दिलेली पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली तेव्हाही त्यानं जामिनासाठी प्रयत्न केला. पण तो प्रयत्नही व्यर्थ गेला होता. अखेर खूप प्रयत्न आणि धावाधाव केल्यानंतर अखेर आज कोल्हापूर कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरुन धमकी देवून महापुरुषांबाबत बदनामीकारक वक्तव्य केलेच्या अनुषंगाने जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे आरोपी नामे प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) याचेविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता. प्रशांत कोरटकर कोण आहे? प्रशांत कोरटकर हा मुळचा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील रहिवासी. पण मागील अनेक वर्षांपासून त्याचे वास्तव चंद्रपूरमध्ये आहे. चंद्रपुरच्या सरदार पटेल महाविद्यालयातील जनसंवाद विद्या विभागात तासीका तत्वावर काम करतो. त्याला बड्या लोकांचे आकर्षण आणि सोशल मीडियाचे प्रचंड वेड असल्याचे दिसून येते. पोलीस अधिकाऱ्यांशी फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करायचा.