Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला ‘या’ 5 जणांनी मदत केली; पोलीस तपासात नवी माहिती समोर

कोल्हापूर : प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) याची तीन दिवसांची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पुन्हा दोन दिवसांची कोठडी सुनावली. त्यामुळे कोरटकर (Prashant Koratkar) याचा कोठडीतला मुक्काम वाढला आहे. एका बाजूला पोलिसांची तपासात प्रगती सुरू असताना दुसऱ्या बाजूला शिवप्रेमींच्या रोषाचा सामनाही कोरटकरला करावा लागत आहे.
‘त्या’ 5 जणांच्या अडचणी वाढणार
आज झालेल्या सुनावणीत पोलिसांनी कोरटकरला फरार काळात मदत करणाऱ्या मित्रांची यादीच न्यायालयाला दिली त्यामुळे त्याच्या मित्रांच्या अडचणी वाढणार आहेत. नागपूरमधील प्रशिक पडवेकर, चंद्रपुरमधील धीरज चौधरी, इंदोरचा हिफाज अली आणि राजेंद्र जोशी, तेलंगणा मधील करिमनगरचा साईराज शेटकर अशी कोरटकरला मदत करणाऱ्या मित्रांची नावे आहेत.
हे पण वाचा : Santosh Deshmukh Case : वाल्मिक गँगचा होणार ‘गेम ओव्हर’; ‘त्या’ व्यक्तीचा जबाब ठरणार महत्वपूर्ण
या मित्रांच्या मदतीने कोरटकर इंदोर, सिकंदराबाद, हैदराबाद आणि तेलंगणामध्ये फिरत होता. यावेळी तो धीरज चौधरी याची MH 34 CD 7720 ही कार वापरत होता. पोलिसांकडून आता हि कार जप्त करण्यात आली आहे. दरम्यान इंद्रजित सावंत यांच्याकडून कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या तपासावर समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
मित्रांची होणार चौकशी
आता कोरटकर (Prashant Koratkar) आणि त्याच्या मित्रांची समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे. तर तो राहत असलेल्या हॉटेलमधील माहिती आणि त्याला आर्थिक रसद कोणी पुरवली याची माहिती पोलीस संकलित करणार आहे. त्यामुळे कोरटकरच्या तर अडचणी वाढणार आहेत त्याबरोबर त्याच्या मित्रांच्यादेखील अडचणी वाढणार आहेत.
प्रशांत कोरटकर कोण आहे?
प्रशांत कोरटकर हा मुळचा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील रहिवासी. पण मागील अनेक वर्षांपासून त्याचे वास्तव चंद्रपूरमध्ये आहे. चंद्रपुरच्या सरदार पटेल महाविद्यालयातील जनसंवाद विद्या विभागात तासीका तत्वावर काम करतो. त्याला बड्या लोकांचे आकर्षण आणि सोशल मीडियाचे प्रचंड वेड असल्याचे दिसून येते. पोलीस अधिकाऱ्यांशी फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करायचा.





