Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरच्या आलिशान गाडीचे गूढ उकलले; पुणे कनेक्शन आले समोर

Prashant Koratkar : इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करणारा प्रशांत कोरटकर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. कोर्टाने कोरटकरला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. मात्र, त्याच्याकडे असलेल्या रोल्स रॉईस कारबद्दल कोरटकर काहीही माहिती द्यायला तयार नाही. याच दरम्यान, कोरटकरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यापैकी एका फोटोमध्ये तो आलिशान रोल्स रॉईस कारसोबत दिसत आहे. मात्र एवढी महागडी गाडी नेमकी कोणाची? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता पुणे कनेक्शन समोर आले आहे.
पिंपरी चिंचवडचे बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्याकडे ही रोल्स रॉईस गाडी असल्याचे समोर आले आहे. ही कार मुळशी तालुक्यातील तुषार कलाटे यांच्या फार्महाऊसवर उभी असल्याचे एका व्हिडीओमधून स्पष्ट झाले आहे. तसेच, WB-02-AB-123 या क्रमांकाच्या रोल्स रॉईस सोबत तुषार कलाटे यांचे काही फोटोही समोर आले आहेत.
विशेष म्हणजे प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटे यांचा एकत्रित व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओत प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटेसह वादग्रस्त तांत्रिक मनोहर भोसले देखील दिसून येत आहे. मनोहर भोसलेंवर याआधी अघोरी विद्येमार्फत भक्तांना लुबाडल्याचे आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल आहेत. तुषार कलाटेंनी ही रोल्स रॉईस प्रशांत कोरटकरच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधातून मिळवली का? हा प्रश्न निर्माण होत आहे.
सरोदे यांनी आलिशान गाडीच्या तपासाची केली होती मागणी
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमावल्याप्रकरणी काल कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. यावेळी कोरटकरला मोठ्या बंदोबस्तात न्यायालयात हजर केलं गेलं. यापूर्वी त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली होती, आता 30 मार्चपर्यंत तो पोलिसांच्या ताब्यात राहील. पोलिसांनी कोरटकरला पळून जाण्यासाठी मदत करणारे, ऑनलाइन पेमेंट आणि वाहनांचा तपास बाकी असल्याचं सांगत कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. तसेच सरोदे यांनी कोरटकरच्या आलिशान गाड्या आणि संशयितांच्या पार्श्वभूमीचा तपास मागितला, तर घाग यांनी सरोदेंना कोर्टात शांत राहण्यास सांगितलं. कोर्टाने पोलिसांच्या बाजूला झुकत कोठडी वाढवली.
प्रशांत कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे. शुक्रवारी (28 मार्च) मोठ्या बंदोबस्तात त्याला न्यायालयात हजर केलं गेलं. यापूर्वी त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली होती, आता 30 मार्चपर्यंत तो पोलिसांच्या ताब्यात राहील. पोलिसांनी कोरटकरला पळून जाण्यासाठी मदत करणारे, ऑनलाइन पेमेंट आणि वाहनांचा तपास बाकी असल्याचं सांगत कोठडी वाढवण्याची मागणी केली होती.





