Prasad Oak and Manjiri Oak | सध्या अनेक सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. यातच आता मराठीतील प्रसिद्ध जोडी प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांचा मोठा लेक सार्थक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच प्रसाद आणि मंजिरी यांचा मोठा मुलगा सार्थकचा साखरपुडा संपन्न झाला आहे. त्यामुळे प्रसाद आणि मंजिरी देखील सासू आणि सासरे या भूमिकेत दिसणार आहेत. सोशल मीडियावर सार्थकच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये प्रसादचं अख्खं कुटुंब दिसत आहे. सार्थकच्या होणाऱ्या पत्नीचं नाव रितू असं आहे. सार्थकने आणि रितूने साखरपुड्यासाठी खास लूक केला होता. सार्थक आणि रितूच्या साखरपुड्याला कलाविश्वातील सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. अमृता खानविलकर, स्वप्निल जोशी उपस्थित होते. Prasad Oak and Manjiri Oak | प्रसाद आणि मंजिरी यांना दोन मुलं आहेत. मोठ्या मुलाचं नाव सार्थक आहे, तर छोट्या मुलाचे नाव मयांक असं आहे. सार्थकने जर्मनीमधून त्याचं शिक्षण पूर्ण केलं आहे. Prasad Oak and Manjiri Oak | हेही वाचा: अंतर्गत कलह, जातीय जनगणना, ५ राज्यांमधील निवडणुका… ; भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांना ‘या’ आव्हानांना तोंड द्यावे लागणार