काय सांगता! हा मराठी अभिनेता साकारणार एकाच सिनेमात तब्बल पाच भूमिका; सिनेमाच नाव माहितीये?

Prasad Oak | मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता प्रसाद ओक याने त्याच्या अनेक सिनेमांमधून लक्षवेधी भूमिका साकारलेल्या आहेत. त्याच्या भूमिका या नेहमीच लक्षात राहण्यासारख्याच असतात. प्रसादने अभिनयासोबतच अनेक सिनेमांचे दिग्दर्शनही केले आहे. तसेच काही सिनेमात दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्ही भूमिका त्याने चोख पार पाडल्या आहेत. आता प्रसाद त्याच्या आगामी एका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात तो एक नव्हे तर तब्बल पाच भूमिका साकारणार आहे. यामुळे त्याच्या सुशिला सुजीत या सिनेमाची बरीच चर्चा होत असून त्याचा सिनेमातील अभिनय पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
सुशीला सुजीत या सिनेमाचं प्रसादने दिग्दर्शन आणि निर्मिती देखील केली आहे. तसेच मराठीतील अनेक कलाकार देखील या सिनेमातून पाहायला मिळणार आहेत. एखादा कलाकार एखाद्या सिनेमात दुहेरी फार तर तिहेरी भूमिका साकारल्याची अनेक उदाहणे आपण पाहिली आहेत. मराठी सिनेमासृष्टीत पहिल्यांदाच एक अभिनेता तब्बल पाच भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
अभिनेता प्रसादने आजवर अनेक हिट सिनेमे दिले आहेत. त्याच्या प्रत्येक सिनेमातील भूमिका ही लक्षवेधी राहिलेली आहे. आता तो सुशीला सुजीत या नव्या सिनेमात साकारणाऱ्या पाच भूमिका कोणत्या असणार आहेत याविषयी मोठी चर्चा होत आहे. या सिनेमाची कथा प्रसादनेची लिहिली आहे .एवढ्या सगळ्या भूमिका आणि त्या सुद्धा एकाच चित्रपटासाठी निभावणं ही खरंतर तारेवरची कसरत असणार आहे, ही कसरत निभावण्यात प्रसाद यशस्वी ठरणार का यासाठी १८ एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. या दिवशी सुशीला सुजीत हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.





