प्रसाद ओक पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत; आगामी चित्रपटात झळकणार दोन दिग्गज कलाकार

Prasad Oak | अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता प्रसाद ओकच्या ‘धर्मवीर 2’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यात आनंद दिघे यांची भूमिका त्याने उत्तमरित्या साकारली होती. यातील त्याच्या अभिनयाचे देखील अनेकांकडून कौतुक करण्यात आले होते.
यातच आता नव्या वर्षात एका नवीन चित्रपटाचे प्रसाद दिग्दर्शन करताना पाहायला मिळणार आहे. ‘सुशीला सुजीत’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक करणार आहे. ‘सुशीला-सुजीत’ची कथा देखील प्रसाद ओकने लिहिली आहे.
दिग्दर्शक आणि कथा लेखन अशी दुहेरी भूमिका सुशीला – सुजीत मध्ये प्रसाद साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट 18 एप्रिल 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात स्वप्निल जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहे. यात सुजितच्या भूमिकेत स्वप्निल जोशी आणि सुशीलाची भूमिका सोनाली कुलकर्णी करणार असल्याचं पोस्टरवरुन स्पष्ट झाले आहे. Prasad Oak |
View this post on Instagram
या पोस्टरमध्ये स्वप्निल आणि सोनाली दरवाजाच्या की होलमधून डोकावून पाहाताना आश्चर्यचकित झालेले दिसतात. या चित्रपटाची निर्मिती स्वप्निल जोशी, प्रसाद ओक, मंजिरी ओक, संजय मेमाणे आणि निलेश राठी करत आहेत. Prasad Oak |
याशिवाय प्रसाद ‘जिलबी’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात देखील दिसणार आहे. यात तो एका उद्योगपतीची भूमिका साकारणार आहे. 17 जानेवारी 2025 ला ‘जिलबी’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. Prasad Oak |
हेही वाचा:
वरुण धवन आणि ॲटली ‘बेबी जॉन’च्या रिलीजपूर्वी पोहचले महाकालेश्वर मंदिरात





