Vada movie teaser : गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी! प्रसाद ओकच्या नव्या सिनेमाचा टीझर प्रदर्शित

Vada movie teaser : नुकताच वडापाव या नव्या मराठी सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या धमाल टीझरमधून नात्यांमधील गोडवा आणि तिखटपणा याची सांगड घालण्यात आली आहे. या सिनेमात एक गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर या टीझर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ही रुचकर पाककृती अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहे.
खरंतर मराठीतील नावाजलेला अभिनेता आणि त्याचबरोबर दिग्दर्शक म्हणून प्रसाद ओक याच्याकडे पाहिले जाते. आजवर त्याने अनेक मराठी सिनेमांचे दिग्दर्शन केलं आहे. त्याच्या अभिनय कारकिर्दीतील त्याचा हा शंभरावा सिनेमा असून तो पहिल्यांदाच एकाच वेळी दिग्दर्शक आणि अभिनेता या दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे.
या सिनेमात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
एबी इंटरनॅशनल फिल्म्स एलएलपी, मर्ज एक्सआर स्टुडिओ, व्हिक्टर मुव्हीज लिमिटेड आणि अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि मोहसीन खान प्रस्तुत, सिनेमॅटिक किडा बॅनर अंतर्गत, प्रसाद ओक दिग्दर्शित वडा पाव हा सिनेमा आहे. अमित बस्नेत, प्रजय कामत, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे या सिनेमाचे निर्माते आहेत.
हेही वाचा : आता जम्मू-काश्मीरमधील दोडामध्ये ढगफुटी ; अनेक ठिकाणी डोंगर घसरले, रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी





