Prasad Oak Achievements : प्रसाद ओकची उत्कृष्ट कामगिरी; पहिला मराठी अभिनेता ठरत रचला विश्वविक्रम
Prasad Oak Achievements : 'धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटात प्रसाद ओकने 'आनंद दिघे' यांची भूमिका साकारली होती.
Prasad Oak Achievements : अभिनेता प्रसाद ओकने एक अभूतपूर्व कामगिरी केली आहे. ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात ‘आनंद दिघे’ यांची भूमिका त्याने साकारली होती. या भूमिकेला मोठा प्रतिसाद मिळाला, अनेकांकडून त्याचे कौतुकही करण्यात आले.
एकाच चित्रपटासाठी आणि एकाच भूमिकेसाठी एकाच वर्षात सर्वाधिक पुरस्कार पटकावण्याचा अनोखा पराक्रम प्रसादने केला आहे. त्याच्या या कामगिरीची नोंद चक्क दोन विश्वविक्रमांमध्ये करण्यात आली आहे.
प्रसाद ओकची पोस्ट
प्रसादने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.यात त्याने लिहिले की, “१३ मे २०२२ यादिवशी धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रदर्शित झाला.हा सिनेमा किती यशस्वी झाला हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्या वर्षात मला सर्वोत्कृष्ट अभिनयाचे एक-एक करून सगळे पुरस्कार मिळाले. खरंतर, इतक्या पुरस्कारांची मला सवय नव्हती. मी बरीच वर्षे या पुरस्कारांची वाट पाहत होतो पण, मला काही केल्या पुरस्कार मिळत नव्हते.
पण, या चित्रपटाच्या निमित्ताने मला अनेक पुरस्कार मिळाले. तेव्हा मला एक गोष्ट जाणवली नव्हती की, या पुरस्कारांची संख्या नेमकी किती आहे किंवा प्रत्येक पुरस्कार मला मिळतोय हे माझ्या लक्षात आलं नव्हतं. पण, जसं वर्ष संपलं, तसं माझ्या लक्षात आलं की, त्यावर्षीचे सगळे पुरस्कार मला ‘धर्मवीर’ चित्रपटासाठी मिळाले आहेत.”
“या सगळ्या पुरस्कारांचं महत्त्व मला आज प्रकर्षाने जाणवतंय कारण, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘ग्लोबल बुक ऑफ Excellence इंग्लंड रेकॉर्ड’ या दोन्ही रेकॉर्ड्समध्ये माझ्या या विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. मी मराठीतला एकमेव कलाकार आहे ज्याला एका वर्षातील, एकाच सिनेमासाठी सर्वाधिक पुरस्कार मिळालेत. Prasad Oak Achievements :
View this post on Instagram
या दोन विश्वविक्रमांची माझ्या नावावर नोंद झालेली आहे. एका मराठी चित्रपटामुळे हा क्षण माझ्या वाट्याला आला याचा मला नितांत अभिमान आहे.”
“या क्षणी मला निर्माते मंगेश देसाई, चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे, माझी धर्मवीरची संपूर्ण टीम या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. ज्या-ज्या संस्थांनी मला पुरस्कार दिले त्यांचे आभार आणि अर्थातच सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार!
धर्मवीर गुरुवर्य आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नव्हतं, त्यांचा मी कायम ऋणी आहे.” अशा भावना प्रसाद ओकने व्यक्त केल्या आहेत. या खास प्रसंगी प्रसादने एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता, जिथे त्याने आपल्या दोन्ही विश्वविक्रमांची झलक सर्वांना दाखवली. Prasad Oak Achievements :
दरम्यान, प्रसाद ओकने शेअर केलेल्या पोस्टवर मराठी कलाकारांनी कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा:





