पुणे – अकल्पनीय कर्तव्यभावना आणि उत्स्फूर्त ऊर्जा यांच्या संगमातून कठोर सामाजिक वास्तवाशी भिडणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा हृद्य सन्मान सोहळा बुधवारी सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिरात रंगला. स्त्रीच्या ठायी असलेल्या कर्तृत्व आणि समर्पण वृत्तीच्या दर्शनाने उपस्थित प्रत्येक रसिक नतमस्तक झाला. दैनिक “प्रभात’चा पहिल्या नारी सन्मान 2020 हा सोहळा मोठ्या दिमाखात व थाटात संपन्न झाला.
याप्रसंगी आर. एम. धारिवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा युवा उद्योजिका जान्हवी धारिवाल, भगिनी निवेदिता सहकारी बॅंक लि.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्मिताताई देशपांडे, महेश नागरी मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि.च्या संस्थापक सदस्या सौ. मैनाताई राठी, बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या उप सरव्यवस्थापिका मृदुलताई जोगळेकर, जेमॉलॉजिस्ट तथा श्री कृष्णा पर्ल्स प्रा. लिच्या संचालिका, युवा उद्योजिका ऐश्वर्या सोमाणी आणि दैनिक “प्रभात’च्या संचालिका सौ. वृषाली गांधी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
या सोहळ्याला दैनिक “प्रभात’ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. आनंद गांधी व सरव्यवस्थापक बी.एल. स्वामी तसेच पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष श्री. पुनीत बालन आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
दैनिक “प्रभात’ आयोजित, “आर. एम. धारिवाल’ प्रस्तुत या कार्यक्रमाला “न्याती ग्रुप’, बॅंक ऑफ महाराष्ट्र’, “महेश नागरी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.’, “सिंहगड इन्स्टिट्यूट’, “श्रीकृष्णा पर्ल्स’ यांचे प्रायोजकत्त्व या कार्यक्रमास लाभले होते.
दै. प्रभात नारी सन्मान 2020′ पुरस्कार जवानांच्या कुटुंबीयांच्या सावली बनलेल्या अनुराधा प्रभुदेसाई, जटामुक्तीच्या खंद्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव, नवचैतन्यदायी हास्ययोगी सुमन काटे, “स्वमग्न’ मुलांची खंबीर आई अर्थात सुनीता लेले आणि वनवासींच्या उत्थानकर्त्या ठमाताई पवार या पाच कर्तृत्ववान महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
समाजात काम करताना आपला शाबासकी रूपाने पाठीवर पडलेली थाप ही आम्हाला उर्जा देणारी आहे. दैनिक प्रभात आयोजित केलला हा सन्मान सोहळा आम्हाला आपल्या चोखंदळ पुणेकरांच्या साक्षीने नवी प्रेरणा देणारा, जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे…अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया सर्व सन्मानित महिलांनी यावेळी आपल्या मनोगतांमधून व्यक्त केली.
यासोबतच उद्योग, व्यवसाय, शिक्षणसंस्था, सेवा क्षेत्रात आपल्या वेगळ्या संकल्पनेने समाजातील आपल्या सारख्याच महिलांसमोर एक वेगळी आदर्श अशी पायवाट घालून देणाऱ्या जिल्हाभरातील 40 हून अधिक कर्तृत्ववान महिलांचा (सुपरवूमन) सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
अखंड संघर्ष, प्रवाहाविरोधात जाण्याची धमक, कडवा विरोध सहन करत परिवर्तन घडवण्याची शक्ती आणि समाजाप्रती असणारी आत्मियता असे अनेक गुण अंगी बाणवणाऱ्या महिलांचा यथोचित सन्मान यावेळी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात करण्यात आला. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरातून विविध क्षेत्रांतील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्तृत्वाला सलाम करत रसिकांनी अनुभवली सुरेल संध्या
कार्यक्रमाची सुरेल सुरुवात रुमानी एंटरप्रायजेसच्या कलाकारांनी नृत्यासह सादर केलेल्या 90 च्या दशकातील सदाबहार लोकप्रिय चित्रपट गीतांनी झाली. सर्व सभागृह कलाकारांच्या सादरीकरणाने मंत्रमुग्ध झालेला असताना प्रत्यक्ष सन्मान सोहळा सुरू झाला. सर्व मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर पहिल्या नारी पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असलेल्या सुमनताई काटे यांचे नाव पुकारताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. यानंतर प्रतिकूल परिस्थितीत आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या ठमाताई पवार यांचा सन्मान करताना रसिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला. यानंतर जटामुक्तीच्या कार्यकर्त्या नंदीनीताई जाधव, स्वमग्न मुलांसाठी काम करत असलेल्या सुनीताताई लेले, “सैनिकांच्या मासी’ अनुराधाताई प्रभुदेसाई यांच्या कार्यालाही रसिक-श्रोत्यांकडून मानाचा मुजरा मिळाला.
कार्यक्रमाचे समयोचित संचालन चित्रा खरे यांनी केले. त्यांनी आपल्या निवेदनातून हा गौरव समारंभ उत्तरोत्तर बहरत ठेवला. कार्यक्रमाची रंगत वाढत असताना पुन्हा दुसऱ्या टप्प्यात कलाकारांचा सदाबहार संगीतमय आविष्कार पाहावयास मिळाला. दैनिक “प्रभात’चे कार्यकारी संपादक श्री. अविनाश भट यांनी उपस्थित सन्मानमूर्ती आणि रसिक-प्रेक्षकांचे आभार मानले.
सन्मानार्थींची छबी टिपण्यासाठी श्रोत्यांची लगबग
प्रचंड उत्साहाने “प्रभात’चे वाचक, हितचिंतक या सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांनी बहारदार गाण्यांच्या कार्यक्रमाचा आनंद लुटला. तसेच पुरस्काराच्या मानकरी महिलांसमवेत आपली सेल्फी मोबाइलमध्ये टिपण्यासाठीही नागरिकांचा उत्साह लक्षवेधी होता. श्रोत्यांच्या उत्साहाने कार्यक्रमाची आणखी रंगत वाढली. मानकरी महिलांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटलेल्या प्रत्येक वाक्याला उपस्थितांनी टाळयांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली.
रसिकांनी अनुभवली सुरेल संध्या
कार्यक्रमाची सुरेल सुरुवात रुमानी एंटरटेन्मेंटच्या कलाकारांनी नृत्यासह सादर केलेल्या 90 च्या दशकातील सदाबहार लोकप्रिय चित्रपट गीतांनी झाली. सर्व सभागृह कलाकारांच्या सादरीकरणाने मंत्रमुग्ध झालेले असताना प्रत्यक्ष सन्मान सोहळा सुरू झाला.
सर्व मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर पहिल्या नारी पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असलेल्या सुमनताई काटे यांचे नाव पुकारताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. यानंतर प्रतिकूल परिस्थितीत आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या ठमाताई पवार यांचा सन्मान करताना रसिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला. यानंतर जटामुक्तीच्या कार्यकर्त्या नंदिनीताई जाधव, स्वमग्न मुलांसाठी काम करत असलेल्या सुनीताताई लेले, “सैनिकांच्या मासी’ अनुराधाताई प्रभुदेसाई यांच्या कार्यालाही रसिक-श्रोत्यांकडून मानाचा मुजरा मिळाला. कार्यक्रमाचे समयोचित सूत्रसंचालन चित्रा खरे यांनी केले. त्यांनी आपल्या निवेदनातून हा गौरव समारंभ उत्तरोत्तर बहरत ठेवला.
कार्यक्रमाची रंगत वाढत असताना पुन्हा दुसऱ्या टप्प्यात कलाकारांचा सदाबहार संगीतमय आविष्कार पाहावयास मिळाला. दैनिक “प्रभात’चे कार्यकारी संपादक श्री. अविनाश भट यांनी उपस्थित सन्मानमूर्ती आणि रसिक-प्रेक्षकांचे आभार मानले.