PM Modi : ‘शाळेपासून ऑलिम्पिकपर्यंत खेळाची इकोसिस्टम बदलणार…’, पंतप्रधान मोदींनी सांगितला ‘एनएसपी मास्टर प्लॅन’

मोदी म्हणाले, “पूर्वी खेळांना करिअरचा पर्याय मानले जात नव्हते, पण आज परिस्थिती बदलली आहे. आता पालकांना आपली मुले खेळात रस घेताना दिसली, तर त्यांना आनंद होतो.” त्यांनी याला चांगले संकेत मानले आणि भारतीय कुटुंबांमध्ये खेळांना स्थान मिळत असल्याचा अभिमान व्यक्त केला.
1 जुलै 2025 रोजी कॅबिनेटने मंजूर केलेल्या राष्ट्रीय क्रीडा धोरणामुळे खेळ प्रशासनात पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित होईल. यामध्ये ‘एक खेळाडू दत्तक घ्या’, ‘एक जिल्हा दत्तक घ्या’, ‘एक कॉर्पोरेट-एक खेळ’ अशा उपाययोजना आणि राष्ट्रीय एजन्सी तसेच आंतर-मंत्रालय समित्यांच्या स्थापनेसह नवीन वित्तपुरवठा यंत्रणेचा प्रस्ताव आहे.
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi hoists the national flag at the Red Fort. #IndependenceDay
(Video Source: DD) pic.twitter.com/UnthwfL72O
— ANI (@ANI) August 15, 2025
हेही वाचा – Akash Deep : आशिया कपआधी भारतीय संघाला मोठा धक्का! आकाशदीप दुखापतीमुळे दुलीप ट्रॉफीतून बाहेर
देशाच्या कानाकोपऱ्यात खेळांचा विकास होईल –
पंतप्रधान म्हणाले, “अनेक दशकांनंतर आम्ही राष्ट्रीय क्रीडा धोरण आणले आहे. यामुळे कोचिंग, फिटनेस आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात खेळांचा विकास होईल.” यानंतर क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक संसदेत मंजूर करुन घेतले, जे राष्ट्रीय क्रीडा संघटनांसाठी कठोर नियामक चौकट आणि वाद निराकरण यंत्रणा सुनिश्चित करते.
हेही वाचा – Khwaja Nafay : पाकिस्तानचा खेळाडू रनआउटनंतर संतापला, लाईव्ह सामन्यातच सहकाऱ्याला खडसावलं, पाहा VIDEO
लठ्ठपणाविरुद्ध लढावे लागेल –
भारताची ऑलिम्पिकमधील कामगिरी आतापर्यंत सरासरी राहिली आहे. टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये एका सुवर्णासह सात पदक हा भारताचा सर्वोत्तम निकाल आहे. मोदींनी फिटनेसवरही भर देत सांगितले की, खाण्यात तेलाचा वापर कमी करून लठ्ठपणाविरुद्ध लढावे लागेल. “लठ्ठपणा ही देशापुढील मोठी समस्या आहे. भविष्यात प्रत्येक तिसरा व्यक्ती लठ्ठपणाचा बळी ठरू शकतो,” असे त्यांनी नमूद केले.
आणखी संबंधित बातम्या
Umesh Yadav Leaves : "मला बाहेर काढण्याचा आधीच कट रचला होता!"; १८ वर्षांनंतर उमेश यादवने का सोडली विदर्भाची साथ?

Ravi Shastri Controversy : "मला हटवण्यामागे वेगळेच राजकारण होते!", १० वर्षांनंतर रवी शास्त्रींनी सोडले मौन; २०१६ मध्ये डावलल्याच्या वेदना उघड

Kapil Dev Warning : "इतक्यात सचिनशी तुलना नको, कांबळीचं उदाहरण पाहा!"; वैभव सूर्यवंशीबाबत कपिल देव यांनी दिला महत्त्वाचा इशारा

Jason Rowles SA20 : १८ वर्षीय युवा खेळाडू SA20 लिलावात ठरला सर्वात महागडा! एमआयला धोबीपछाड देत सुपर किंग्सने मारली बाजी

Top 10 Sports News : नानांच्या जाण्याने गावस्कर भावुक, भुवीचे कमबॅक अन् मेस्सीचा फेअरवेल; पाहा क्रीडा विश्वातील टॉप-१० घडामोडी

