फलटण डॅाक्टर तरुणी प्रकरण: सुषमा अंधारे यांचं ट्वीट चर्चेत; CM फडणवीसांना विचारले थेट ‘ते’ चार प्रश्न

Sushma Andhare post : मूळची बीड जिल्ह्यातील रहवासी असलेली डॅा. संपदा मुंडे या तरुणीच्या मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्र हादरला आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात डॅा. संपदा मुंडे कार्यरत होत्या. त्यांनी हातवर सुसाईट नोट लिहून आयुष्य संपवले. त्यांच्या मृत्यू प्रकरणाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्सवरून ट्वीट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणात सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
हेही वाचा : तारीख ठरली ! डीके शिवकुमार होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री? पत्रकाराने सवाल करताच सिद्धरामय्या भडकले
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देखील अंधारेंनी केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. सुषमा अंधारे या प्रकरणावर फलटणमध्ये येणार आहेत. याबाबतही त्यांनी पोस्टमध्ये माहिती दिली आहे. स्व. डॅा. संपदाताई मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी चलो फलटण असे त्यांनी ट्वीटमध्ये शेअर केलेल्या पोस्टवर म्हटले आहे. ३ नोव्हेंबर रोजी अंधारे फलटणमध्ये येणार आहेत. त्यामुळे त्या आणखी कोणता मोठा दावा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
सुषमा अंधारे यांचे एक्स ट्वीट
तीन तारखेला नुसतं येते म्हटलं की लगेच नेमली समिती…!! देवेंद्रजींनी SIT नेमली याचं कौतुक करणाऱ्या पोस्टी चा रतीब पाठीचा कणा नसणारे त्यांचे दरबारी पाडत आहेत… हे उल्लेखनीय आहे की, इतके दिवस हे बोलघेवडे बिळामध्ये लपून बसले होते. आज अचानक कंठ फुटला आहे, असा खोचक निशाणा त्यांनी ट्वीटमधून साधला आहे.
तीन तारखेला नुसतं येते म्हटलं की लगेच नेमली समिती…!!
देवेंद्रजींनी SIT नेमली याचं कौतुक करणाऱ्या पोस्टी चा रतीब पाठीचा कणा नसणारे त्यांचे दरबारी पाडत आहेत…
हे उल्लेखनीय आहे की, इतके दिवस हे बोलघेवडे बिळामध्ये लपून बसले होते. आज अचानक कंठ फुटला आहे.
पण जर कंठ फुटलाच आहे तर… pic.twitter.com/XB7JYNxMMr— SushmaTai Andhare (@andharesushama) October 31, 2025
पुढे त्या म्हणाल्या, पण जर कंठ फुटलाच आहे तर मग त्याच देवेंद्रजींना हाही प्रश्न विचारावा की जर आत्ता SIT नेमली, तर मग त्या आधीच रणजीत नाईक निंबाळकरांना क्लीनचीट देण्याची घाई का केली.? तुम्ही नेमलेली एसआयटी रणजीत नाईक निंबाळकर यांना चौकशीच्या कक्षेत आणणार आहे का? डॉ. अंशुमन धुमाळ, DYSP राहुल धस, सुनील महाडिक API जायपात्रे, PSI पाटील , नाईक निंबाळकरांचे दोन पीए , हे सगळे चौकशीच्या कक्षेत येणार का ? आदर्की गावातील रत्नशिव निंबाळकर यांच्या खून प्रकरणातील पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी संपदा मुंडे वर दबाव होता याचा तपास होणार का ? असे सवाल सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले आहेत.





