#PKLSeason10 (#CHEvPAT Match 34) : पाटणा पायरट्सचा तमिळ थलैवाजवर सहज विजय…

Pro-Kabaddi League 2023-24 (Chennai) – प्रो-कबड्डी लीगच्या शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात पाटणा पायरट्सने अत्यंत सहजतेने तमिळ थलैवाजचा ४६-३३ असा पराभव केला. या विजयासह पाटणा संघाने स्पर्धेतील आगेकूच कायम राखली. या सामन्यात पहिल्या सत्रातच पाटणा संघाने घेतलेली आघाडी अखेरपर्यंत टीकवली.
थलाइवाज़ के प्लेटफार्म पर चल पड़ी है पाइरेट्स की गाड़ी 🚆
पटना वालों आज खुश तो बहुत होंगे तुम 🤩#ProKabaddiLeague #ProKabaddi #PKLSeason10 #PKL #HarSaansMeinKabaddi #CHEvPAT #TamilThalaivas #PatnaPirates pic.twitter.com/lFhE3mydp4
— ProKabaddi (@ProKabaddi) December 22, 2023
या लढतीत पाटणाच्या एम. सुधाकरने ११ लोण चढवताना अफलातून चढाया केल्या. त्याला साथ देताना मंजीतने ८ गुण मिळवले. सचिनने ७, किशनने ५ तर संदीप कुमारने ४ गुणांची कमाई केली. या सामव्यात रेड गुणांत बाजी मारताना पाटमा संघाने तब्बल २९ गुण मिळवले तर टॅकलचे १२ आमि सर्वबादचे ४ गुण पटकावले. या उलट कामगिरी तमिळ संघाची ठरली. त्यांच्या हिमांशूने सर्वाधिक १० लोण चढवले मात्र, त्यांचा स्टार खेळाडू हिमांशू नरवालला मात्र आपल्या दर्जानुसार खेळ करता आला नाही. त्यांचा आणखी एक स्टार खेळाडू नरेंद्र होशियारही सपशेल अपयशी ठरला. त्याला केवळ ५ गुणांचीच कमाई करता आली.
अजिंक्य पवारने मोक्याच्या क्षणी सहा गुणांची कमाई करत चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याला अन्य खेळाडूंची साथ लाभली नाही. तमिळ संघाने २१ रेड गुण मिळवले मात्र, ते बचावात अत्यंत कमकुवत ठरले. सुरुवातीपासूनच पाटणा संघाने त्यांना दडपणाखाली ठेवले होते व अखेरपर्यंत त्यांना आक्रमक खेळ करु दिला नाही. हाच या दोन संघातील निर्णायक फरक ठरला व पाटणा संघाने हा सामना जिंकत बाजी मारली.
#PKLSeason10 (#PUNvBLR Match 33) : पुणेरी पलटणचा दणदणीत विजय….
तमिळ संघाने पहिल्या सत्रात आलेले अपयश काही प्रमाणात दुसरे सत्र सुरु झाल्यावर पुसुन काढण्याचा प्रयत्नही केला. त्यांनी आक्रमक चढाया केल्या परंतू त्यांना पाटणाची आघाडी कमी करता आली नाही. खरेतर या सामन्यातत्यांना नरवाल व होशियारकडून खूप अपेक्षा होत्या. हेच त्यांचे सामना जिंकून देणारे खेळाडू होते मात्र, या लढतीत त्यांची कामगिरी अत्यंत सुमार ठरली.





