Pro Kabaddi 2024 (Match 127) | परदीप नरवाल पुन्हा फ्लॉप, बेंगळुरू बुल्सचा सलग पाचवा पराभव…

Pro Kabaddi League 2024 (Tamil Thalaivas vs Bengaluru Bulls) : प्रो कबड्डी लीग 2024 च्या 127 व्या सामन्यात तमिळ थलैवाजने बेंगळुरू बुल्सचा 42-32 असा पराभव केला. थलैवाजने हा सामना सहज जिंकला आणि बुल्सला एकही गुण मिळाला नाही.
சீக்கிரம் கிடைத்த புத்தாண்டு கிஃப்ட் இது 🥹 தரமான ஆட்டம் #TamilThalaivas 💛❤️#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #BengaluruBulls pic.twitter.com/9MfaNtRXjh
— ProKabaddi (@ProKabaddi) December 22, 2024
या सामन्यात परदीप नरवालने केवळ 4 गुण घेतले आणि तो फ्लॉप ठरला. तथापि, बेंगळुरू बुल्ससाठी, सुशीलने या प्रो कबड्डी लीग सामन्यात 15 रेड पॉइंट्स घेतले आणि डिफेंसमध्ये नितीन रावलने 4 टॅकल पॉइंट घेतले. तामिळ थलैवाजसाठी हिमांशूने 11 रेड पॉइंट्स घेतले आणि डिफेंसमध्ये अमीरहोसेन बस्तामीने 4 टॅकल पॉइंट घेतले.
थलैवाजचा हा 8वा विजय असून ते 50 गुणांसह 9व्या स्थानावर आहेत तर बेंगळुरू बुल्सचा हा सलग 5वा पराभव असून ते 19 गुणांसह शेवटच्या 12 व्या स्थानावर आहेत. या दोन्ही संघांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
दरम्यान आतापर्यत प्रो कबड्डी लीग स्पर्धेत हरियाणा स्टीलर्स (21 सामन्यांनंतर 79 गुण), पाटणा पायरेट्स (22 सामन्यांनंतर 77 गुण),दबंग दिल्ली केसी (21 सामन्यांनंतर 76), युपी योद्धा (21 सामन्यांनंतर 74 गुण) आणि जयपूर पिंक पँथर्स (22 सामन्यांनंतर 70 गुण ) यांनी प्ले-आॅफमध्ये स्थान निश्चित केलं आहे.





