Pro Kabaddi 2024 (Match 95) : गुजरात जायंट्सचा आणखी एक पराभव, प्लेऑफची वाट झाली खडतर…

Pro Kabaddi 2024 (Tamil Thalaivas vs Gujarat Giants) : प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामात शुक्रवारी गुजरात जायंट्स आणि तामिळ थलैवाज यांच्यात 95 सामना पार पडला. यामध्ये गुजरात जायंट्स संघाला आणखी एक पराभवाचा सामना करावा लागला आहे. तामिळ थलैवाजने त्यांचा 40-27 असा पराभव केला.
அடிச்சு துவம்சம் செய்த தருணம் 😍
மாஸ்.. மாஸ் டேக்கிள்ஸ் 😎#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #TamilThalaivas #GujaratGiants pic.twitter.com/7FHatCjQSP
— ProKabaddi (@ProKabaddi) December 6, 2024
गुजरात जायंट्सचा 16 सामन्यातील हा 10 वा पराभव ठरला. गुजरातला फक्त 4 सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे प्रो कबड्डी 2024 च्या प्लेऑफची त्याची वाट खडतर झाली आहे. तर दुसरीकडे तामिळ थलैवाज हा 16 सामन्यातील सहावा विजय ठरला, त्यांना देखील आतापर्यंत 9 सामन्यात पराभवाचा फटका बसला आहे.
गुजरात जायंट्ससाठी या सामन्यात रेडर्स सपशेल फ्लाॅप ठरले. विशेषत: गुमान सिंगला एकच गुण घेता आला. तमिळ थलैवाजच्या वतीने, मोईन शफाघीने चमकदार कामगिरी केली आणि एकूण 13 गुण मिळविले. हिमांशूनेही त्याला चांगली साथ देत 7 गुण मिळवले. गुजरातसाठी तीन बचावपटू आपले गुणांचे खातेही उघडू शकले नाहीत.
Pro Kabaddi League 2024 | दबंग दिल्ली-युपी योद्धाज लढत बरोबरीत…
थलैवाज संघाने चढाईतून 23 तर पकडीतून 13 गुणांची कमाई केली. गुजरात संघाला चढाईतून 16 तर पकडीतून केवळ 07 गुणांची कमाई करता आली. तामिळ थलैवाजसंघाने 2 वेळेस तर गुजरात संघाने एकदा एकमेकांवर लोन चढविले. थलैवाजकडून मोईन शफाघीने 13गुणांची कमाई करताना संघाला विजय मिळवून दिला. गुजरात संघाकडून हिमांशूने 11 गुण मिळविताना चांगली लढत दिली.





