Pro Kabaddi 2024 (Match 113) | तमिळ थलैवाजचे आव्हान जवळपास संपुष्टात….

Pro Kabaddi League 2024 (Tamil Thalaivas vs Jaipur Pink Panthers) : प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामातील 113 सामना आज जयपूर पिंक पँथर्स आणि तमिळ थलैवाज यांच्यात पार पडला. यामध्ये सचिन तन्वरचा तमिळ थलैवाज संघ प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामातून बाहेर झाला आहे.
पैंथर्स ने थलाइवाज़ पर दर्ज की धमाकेदार जीत 💥🩷#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #TamilThalaivas #JaipurPinkPanthers pic.twitter.com/hJX1aAPqim
— ProKabaddi (@ProKabaddi) December 15, 2024
जयपूर पिंक पँथर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात तमिळ थलैवाजला 27-34 असा पराभव स्वीकारावा लागला. यासह त्याचा पीकेएलमधील प्रवास आता संपला आहे. आता त्यांनी त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकले तरीही त्यांना केवळ 55 गुणांपर्यंतच मजल मारता येईल. अशा स्थितीत त्यांच्यासाठी प्लेऑफचे दरवाजे बंद झाले आहेत.
Pro Kabaddi 2024 (Match 110) | बेंगळुरू बुल्सचा पुन्हा एकदा लाजिरवाणा पराभव….
थलैवाजसाठी, कर्णधार नितीश कुमारने डिफेंसमध्ये (बचाव) चमकदार खेळ केला आणि 7 गुण मिळवले पण रेडर्सला अजिबात चांगली कामगिरी करता आली नाही. जयपूर पिंक पँथर्सच्या अंकुशने बचावात हाय फाइव्ह पूर्ण केलं. याशिवाय सुरजीत सिंगने 4, रजा मिरबाघेरीने 3 गुण आणि कर्णधार अर्जुन देशवाल आणि नीरजने 6-6 गुण घेतले.





