पुणे – पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या येरवडा येथील डाॅ. आंबेडकर महाविद्यालयाने पुणे ग्रंथ महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या संतांच्या व महापुरुषांच्या ज्ञान सरिता ग्रंथ दिंडीत उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन फर्ग्युसन महाविद्यालय येथे करण्यात आले होते. डॉ.आंबेडकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ज्ञान सरिता ग्रंथ दिंडी आयोजित करण्यात आली होती. या ग्रंथ दिंडीमध्ये ५० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. या दिंडीचे प्रमुख आकर्षण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वेशात आलेला महाविद्यालयाचा विद्यार्थी वैभव राऊत हा होता.
या दिंडीमध्ये ग्रंथ दिंडीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित विविध मह्त्वपुर्ण पुस्तके ठेवण्यात आली होती. या ज्ञान सरिता ग्रंथ दिंडीसाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.मनोज पांडकर व प्रा. डॉ.गौतम बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. या दिंडीचे आयोजन महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.संपत शिंदे यांनी केले. यात प्रा.डॉ.आप्पाराव चव्हाण, प्रा.डॉ.वर्षाराणी वाघमारे, प्रा.सुवर्णा कांबळे व प्रा. शिवाजी मोटेगावकर यांनी सहभाग घेतला.
या ग्रंथ दिंडीसाठी पालखी फुलांनी सजविण्यात आली होती. स्वयंसेवकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणुन सोडला. ग्रंथ दिंडीच्या माध्यमातुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, कार्य सतत जागृत ठेवुन ते आत्मसात करण्याचा संदेश देण्यात आला आहे.