Pakistan Cricket Board : PSL संघाच्या मालकाने PCBची काढली लाज, कायदेशीर नोटीस फाडून दिले चोख प्रत्युत्तर, VIDEO व्हायरल

Ali Khan Tareen criticism of Pakistan Cricket Board : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) मधील मुल्तान सुल्तान्स संघ यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. मुल्तान सुल्तान्सचे मालक अली खान तरीन यांना काही दिवसांपूर्वी पीसीबीने कायदेशीर नोटीस पाठवली होती. त्यांच्यावर पीएसएलच्या काही नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप होता आणि त्यांना व्हिडिओद्वारे माफी मागण्यास सांगितले होते. मात्र, अली खान तरीन यांनी याला सणसणीत प्रत्युत्तर देताना पीसीबीची नोटीस फाडत व्हिडीओ शेअर केला आहे. जो प्रचंड व्हायरल होत आहे.
अली खान तरीन यांनी पीसीबीवर ओढले ताशेरे –
पाकिस्तान सुपर लीगला दहा वर्षे पूर्ण होत असून, मुल्तान सुल्तान्सच्या मालकीचा करार येत्या डिसेंबरमध्ये संपणार आहे. यानंतर अली खान तरीन यांच्यासह इतर इच्छुक मालकी हक्कासाठी बोली लावणार आहेत. मात्र, मुल्तान सुल्तान्सने यापूर्वी दावा केला होता की, पीसीबीने अली खान यांना पीएसएल व्यवस्थापनाच्या टीकेमुळे बोली लावण्यास बंदी घालण्याची धमकी दिली आहे. याच संदर्भात पीसीबीने अली खान यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती आणि माफी मागण्यास सांगितले होते.
व्हिडीओ होतोय व्हायरल –
The PSL Management has sent me a notice threatening to cancel Multan Sultans unless I offer them a public apology. Hazir Saeen. pic.twitter.com/yHWCcClXaD
— Ali Khan Tareen (@aliktareen) October 23, 2025
अली खान यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत पीसीबीवर जोरदार टीका केली. त्यांनी व्हिडीओमध्ये सांगितले की, व्यवस्थापनाने चुका सुधारण्याऐवजी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली. त्यांनी पीसीबीच्या चुकीच्या धोरणांवर आणि कारभारावर सडेतोड टीका केली. व्हिडीओच्या शेवटी त्यांनी कायदेशीर नोटीस फाडून टाकली आणि याचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नसल्याचे दाखवून दिले. त्यांनी उपरोधिकपणे म्हटले, “मला आशा आहे की तुम्हाला माझ्या या माफीचा व्हिडाओ आवडला असेल.”
हेही वाचा – IND vs AUS : ‘…फेअरवेल मॅच होती, एक फोटो तरी टाक’, चाहत्यांच्यासमोरच रोहितला काय म्हणाला गंभीर , पाहा VIDEO
चाहत्यांचा अली खान यांना पाठिंबा –
You can criticize his fathers antics and disagree with his politics but this reply from Ali is exactly how these PCB goons need to be treated, especially that pathetic loser Naqvi who has single-handedly destroyed Pak cricket. He’s a small insecure little man who needs yes men…
— Futbol Heritage (@blueunbiasedcfc) October 23, 2025
पीसीबीवर प्रश्न उपस्थित केल्यामुळे अली खान तरीन यांना चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की, अली खान यांनी योग्य पाऊल उचलले आहे आणि त्यांचे प्रत्युत्तर अचूक आहे. एका चाहत्याने लिहिले, “तुम्ही त्यांच्या वडिलांच्या राजकारणावर टीका करू शकता, पण अली यांचे उत्तर अगदी बरोबर होते. पीसीबीच्या गुंडांना असेच प्रत्युत्तर मिळायला हवे. विशेषतः मोहसिन नक्वी यांना, ज्यांनी एकहाती पाकिस्तान क्रिकेटचा सत्यानाश केला आहे. त्यांना फक्त होकार देणारे लोक हवेत. आशा आहे की इतर संघही मुल्तान सुल्तान्सच्या पाठीशी उभे राहतील.”





