कराची – पाकिस्तानची घरच्याच मैदानावरील खराब कामगिरी सातत्याने सुरूच आहे. पहिल्या कसोटी सामन्यात यजमान संघाने न्यूझीलंडला चांगली लढत दिली. त्यामुळे यजमानांना पहिला सामना अनिर्णित राखण्यात यश आले. मात्र, दुसऱ्या सामन्यात पाहुण्या संघातील डेव्हन कॉनवेने पाकिस्तानच्या गोलंदाजांना चांगलेच धुतले. त्याने 122 धावांची शतकीय खेळी करत 2023 या वर्षातील पहिले शतक झळकावण्याचा मान मिळवला आहे. महत्वाचं म्हणजे, मागील वर्षीदेखील कॉनवेने ही कामगिरी केली होती. त्याअगोदर 2021 या वर्षाच्या सुरुवातीलाच केन विलियम्सनने हा मान मिळवला होता.
BCCI ची यो-यो व डेक्सा स्कॅनची चाचणी नेमकी आहे काय? रोहित, कोहली व पंड्यासाठीही ठरू शकते डोकेदुखी
यजमान पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात सोमवारी पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा 6 गडी गमावून 309 धावांची मजल मारली आहे. सलामीवीर डेव्हन कॉनवेचे दमदार शतक तर टॉम लॅथमच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पाकिस्तानच्या गोलंदाजांवर सुरुवातीला वर्चस्व राखले.
#INDvsSL2023 | नवोदितांना सुवर्णसंधी! यजमान भारताचा उद्या श्रीलंकेशी पहिला टी-20 सामना
न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय कॉनवे व लॅथम यांनी सार्थ ठरवताना संघाला शतकी सलामी दिली. दरम्यान या दोघांनीही आपापली अर्धशतके पूर्ण केली. लॅथम 71 धावांची खेळी करुन बाद झावा व ही जोडी फुटली. त्यानंतर कॉनवेने आपले शतक साकार केले. त्याने माजी कर्णधार केन विल्यमसनच्या साथीत दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली व संघाचे द्विशतक फलकावर लावले. 122 धावांची खेळी करणारा कॉनवेही वेगाने धावा करण्याच्या प्रयन्तात बाद झाला. त्यानंतर रंगात आलेला विल्यमसनही 36 धावांवर बाद झाला.
STUMPS: New Zealand 309/6 (90 ov, won the toss) v Pakistan
Sodhi 11 (29) Blundell 30 (62)https://t.co/jI4w8TPbSS— ESPNcricinfo scores (@ESPNscorecard) January 2, 2023
हेनरी निकोल्सची चांगला खेळत असताना 26 धावा करुन बाद झाला. अफलातून फलंदाजीची ख्याती असलेल्या डॅरेल मिशेलने साफ निराशा केली. यावेळी थाटात सुरुवात केलेल्या न्यूझीलंडच्या धावांवर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अंकुश राखला. मायकल ब्रेसवेल तर खातेही उघडू शकला नाही. त्यानंतर मात्र, संघाचे त्रिशतक फलकावर लावताना टॉम ब्लंडेलने नाबाद 30 तर इश सोधीने नाबाद 11 धावांची खेळी करत उर्वरीत खेळात संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही. पकिस्तानकडून आघा सलमानने 3 तर, नसिम शाहने 2 गडी बाद केले. अबरार अहमदने 1 बळी घेतला.