Abhishek Sharma Bat Check : अभिषेकच्या बॅटमध्ये नक्की काय लपलंय? न्यूझीलंडच्या खेळाडूंनी घेतली झडती; VIDEO व्हायरल
Abhishek Sharma Bat Check : सध्या सोशल मीडियावर न्यूझीलंडचे खेळाडू अभिषेक शर्माची बॅट चेक करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Abhishek Sharma Bat check video viral : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात युवा फलंदाज अभिषेक शर्माने आपल्या तुफानी फलंदाजीने केवळ प्रेक्षकांनाच नव्हे, तर प्रतिस्पर्धी खेळाडूंनाही अवाक केले. भारताने हा सामना ८ गडी राखून जिंकत मालिकेत ३-० अशी अजेय आघाडी घेतली आहे. मात्र, या विजयापेक्षा सध्या अभिषेक शर्माची बॅट आणि किवी खेळाडूंनी तिची केलेली तपासणी याचीच चर्चा जास्त रंगली आहे.
बॅटमध्ये नक्की आहे तरी काय?
अभिषेक शर्माने या सामन्यात ३४० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत अवघ्या २० चेंडूत नाबाद ६८ धावा कुटल्या. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार ठोकले. अभिषेकच्या बॅटमधून निघणारा प्रत्येक चेंडू सीमापार जात होता. हे पाहून न्यूझीलंडचे खेळाडू इतके चकित झाले की, सामना संपल्यानंतर अभिषेक शर्माच्या बॅटची तपासणी केली.
सलामीवीर डेव्हॉन कॉनवे आणि वेगवान गोलंदाज जॅकब डफी यांनी थेट अभिषेकची बॅट हातात घेऊन ती तपासायला सुरुवात केली. बॅटमध्ये काही चिप किंवा खास तांत्रिक गोष्ट तर नाही ना, अशा मिश्किल अंदाजात ते बॅट चेक करताना दिसले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Yesterday, New Zealand players were checking Abhishek Sharma’s bat after the match.
I don’t recall any other player’s bat being checked like this
The last time I remember opposition players checking a bat was during Sachin Tendulkar’s era
— Space Recorder (@1spacerecorder) January 26, 2026
युवराज सिंगनंतर अभिषेकचाच नंबर!
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक
अभिषेक शर्माने या सामन्यात केवळ १४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह तो भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा खेळाडू ठरला आहे. या यादीत अव्वल स्थानी युवराज सिंग (१२ चेंडू) असून, अभिषेकने आता दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
हेही वाचा – धक्कादायक निर्णय! केएल राहुलचे संघात पुनरागमन, कर्णधारही अचानक बदलला
“सचिनची आठवण झाली!”- चाहत्यांच्या प्रतिक्रिया
अभिषेक शर्माची बॅट चेक करताना पाहून अनेक चाहत्यांना सचिन तेंडुलकरच्या काळातील आठवण झाली. एका युजरने लिहिले की, “विरोधकांनी अशा प्रकारे बॅट चेक करण्याची घटना खूप वर्षांनी पाहायला मिळाली. यावरून अभिषेकने किती दहशत निर्माण केली आहे हे समजते.”





