Tim Seifert Record : टिम सायफर्टचा मोठा पराक्रम! किवींची ९ वर्षांनंतर भारताविरुद्ध ऐतिहासिक कामगिरी
Tim Seifert Record : टिम सायफर्टने भारताच्या विरोधात न्यूझीलंडकडून सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

Tim Seifert Record broking fifty against India : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. सलामीवीर टिम सायफर्ट आणि डेव्हॉन कॉनवे यांनी मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस पाडत अनेक जुने विक्रम मोडीत काढले. विशेषतः टिम सायफर्टने भारताच्या विरोधात न्यूझीलंडकडून सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
टिम सायफर्टची रेकॉर्डब्रेक फटकेबाजी –
विशाखापट्टणमच्या मैदानावर सायफर्टने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्याने अवघ्या २५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह त्याने केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे (ज्यांनी २०२० मध्ये ऑकलंडमध्ये २५ चेंडूत ५० धावा केल्या होत्या). सायफर्टने भारतीय गोलंदाजीवर प्रहार करताना आपला स्ट्राईक रेट २०० च्या जवळ राखला, ज्यामुळे न्यूझीलंडला पॉवरप्लेमध्ये मोठी धावसंख्या उभारता आली.
९ वर्षांचा दुष्काळ संपला!
215 on the board in Vizag with Tim Seifert leading the charge with 62 off 36 at the top of the order.
Watch the action LIVE in NZ on Sky Sport.#INDvNZ | 📸 BCCI pic.twitter.com/D0nGLispkE
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 28, 2026
सायफर्ट आणि डेव्हॉन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी केवळ ८.२ षटकांत १०० धावांची ऐतिहासिक भागीदारी केली. २०१७ नंतर म्हणजेच तब्बल ९ वर्षांनंतर भारतीय भूमीवर एखाद्या सलामीच्या जोडीने टीम इंडियाविरुद्ध १०० हून अधिक धावांची भागीदारी करण्याचा पराक्रम केला आहे. यापूर्वी २०१७ मध्ये मार्टिन गप्टिल आणि कॉलिन मुनरो यांनी राजकोटमध्ये १०५ धावांची भागीदारी केली होती.कॉनवेने २३ चेंडूत ४४ धावांची वेगवान खेळी केली. अखेर कुलदीप यादवने त्याला बाद करत ही जोडी फोडली.
टिम सायफर्टचा भारताविरुद्ध सर्वात जलद अर्धशतकांचा विक्रम
५ वर्षांची प्रतीक्षा संपली –
२०२० पासून आतापर्यंत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या १७ टी-२० सामन्यांमध्ये किवी सलामीवीरांना एकदाही ५० धावांची भागीदारी करता आली नव्हती. मात्र, सायफर्ट आणि कॉनने यांनी थेट १०० धावांची भागीदारी करत न्यूझीलंडची ५ वर्षांपासूनची प्रतीक्षा संपवली आहे. २०२२ च्या टी-२० वर्ल्ड कप सेमीफायनलनंतर भारताच्या विरोधात झालेली ही पहिलीच शतकी सलामी आहे.
न्यूझीलंडने भारतासमोर २१६ धावांचे लक्ष्य ठेवले –
न्यूझीलंडने भारतासमोर २१६ धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने टिम सेफर्टच्या ६२ धावांच्या जोरावर २० षटकांत सात गडी गमावून २१५ धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन, तर जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.





