मुंबई – बीसीसीआयने भारतीय क्रिकेटसाठी नव्या नियमांची घोषणा केली मात्र, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणार का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. संघात स्थान मिळवण्यासाठी तसेच दुखापत झालेल्या खेळाडूंना संघात पुनरागमन करण्यासाठी व संघात निवडीसाठी आवश्यक निकष असतील ते पूर्ण करणे गरजेचे असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. मात्र, संघातील जागा सातत्याने टीकवण्यात यशस्वी ठरत असलेल्या खेळाडूंना तसेच नवोदितांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आता केवळ सामने खेळून किंवा यशस्वी होऊन चालणार नाही तर या खेळाडूंना नव्या नियमांचीही पूर्तता करावी लागणार आहे. बीसीसीआयने नियम तर जाहीर केले मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होणार असा सवालही निर्माण होत आहे.
#INDvsSL2023 | नवोदितांना सुवर्णसंधी! यजमान भारताचा उद्या श्रीलंकेशी पहिला टी-20 सामना
काय आहेत नियम
– नवोदितांना संघात येण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळावेच लागेल
– देशांतर्गत क्रिकेटमध्ये निकषांनूसार सामने खेळले आहेत का ते पाहिले जाणार
– रणजी तसेच मुश्ताक अली स्पर्धेतील कामगिरीही महत्वाची
– प्रमुख खेळाडूंना आयपीएलपासून दूर ठेवणार
– रोहित, कोहली व पंड्यालाही हाच निकष
– दुखापतग्रस्त खेळाडू पूर्ण तंदुरुस्त ठरल्याचा आहवाल महत्वाचा
– संभाव्य 20 खेळाडूंमधूनच संघाची निवड
– वर्कलोडबाबत खेळाडूंना संवाद साधणे बंधनकारक
– यो-यो व डेक्सा स्कॅनची चाचणी अत्यावश्यक
– आयपीएल स्पर्धेतून थेट संघ निवड नाही
#INDvsSL2023 | नवोदितांना सुवर्णसंधी! यजमान भारताचा उद्या श्रीलंकेशी पहिला टी-20 सामना
रोहितला दिलासा
हार्दिक पंड्या याच्याकडे श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व सोपवण्यात आल्यावर रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, रोहितच नियमित कर्णधार असून एकदिवसीय तसेच कसोटीसाठी त्याच्याकडेच नेतृत्व राहिल असा खुलासा बीसीसीआयने केला व रोहितला दिलासा दिला आहे. मात्र, टी-20 संघाच्या नेतृत्वाबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रीया व्यक्त केलेली नाही, रोहितच्या तंदुरुस्तीवरच सर्व अवलंबून राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
अशी असते डेक्सा चाचणी
खेळाडूंच्या तंदुरुस्तीचे तसेच त्यांच्या शरीरातील हाडांची स्थिती याबाबत अत्यंत अचुक माहिती मिळणारी ही चाचणी असते. वरकरणी एक्स-रे सारखी दिसणारी ही चाचणी खेळाडूंच्या हाडांची ताकद व क्षमता यांचे माजमाप करते. या चाचणीत खेळाडूच्या हाडांना जर फ्रॅक्चर असेल किंवा त्या हाडाची ताकद कमी झाली असेल तरे ते स्पष्ट समजते. या चाचमीद्वारे हाडाची जाडी किंवा त्याला झालेला आघात कीती मोठा आहे हे पाहिले जाते. तसेच हाडातील मिनिरलचे प्रमाण किती आहे हे देखील अचुकपणे सांगितले जाते. या चाचणीचा अहवाल आल्यावरच हा खेळाडू पूर्ण तंदुरुस्त तसेच मॅचफिट आहे का ते स्पष्ट होते.