पैठण – पैठण शहरात (paithan) असलेली श्री भद्रकाली देवी (bhadrakali devi) ही अविवाहित युवक/युवतींचे श्रद्धास्थान आहे. श्री भद्रकाली देवी ही कुमारिका असून तिची पूजा, उपवास केल्यास अविवाहितांचे विवाह जुळून येतात, अशी आख्यायिका आहे. लग्न जुळवण्यापूर्वी भद्रकालीचे दर्शन घेऊनच लग्नाची बोलणी केली जाते आणि लग्नानंतर भद्रकालीचे दर्शन घेऊनच नवदांपत्य वैवाहिक जीवनाला सुरुवात करतात, ही परंपरा पूर्वापारपासून चालत आलेली आहे.
सध्या नवरात्रोत्सवात (navratri) सर्व जाती-धर्मातील तरुण/तरुणी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याचे मंदिराचे पुजारी दुर्गादास चक्रे यांनी सांगितले. पैठण शहरातील जरगल्ली भागात मंदिराचे पुजारी रेणुकादास, दुर्गादास, सुहास चक्रे यांच्या प्राचीन वाड्यात भद्रकाली देवीचे मंदिर आहे. कुमारिका श्री भद्रकाली देवीची सुमारे 300 वर्षांपूर्वीची प्राचीन मूर्ती आहे. या देवीच्या पूजेला श्रीफळ, खडीसाखर, तूर हे साहित्य वापरले जाते.
मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या दिवशी भाविक मोठ्या संख्येने आवर्जुन दर्शनासाठी येतात. तिच्या कृपेने लग्न झाल्यावर तिच्या दर्शनासाठी पुन्हा पैठणला जोडीने येतात.
नवरात्रोत्सवात दर्शनासाठी गर्दी सध्या नवरात्रीच्या काळात भद्रकाली देवीच्या दर्शनासाठी मराठवाड्यासह इतर राज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत, तर पंचक्रोशीतील तसेच शहरातील भाविक पहाटेच अनवाणी पायी येऊन दर्शन घेत आहेत. दर्शनासाठी युवक-युवतींची जास्त गर्दी पैठणच्या भद्रकालीचे वेगळे महत्त्व आहे.