युक्रेनच्या 117 ड्रोन हल्ल्यात 40 रशियन लढाऊ विमाने, 5 हवाई तळ उद्ध्वस्त ; झेलेन्स्कींचे दीड वर्षांचे नियोजन यशस्वी

Operation Spider Ukraine | रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेले युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता युक्रेनने रशियन लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून युक्रेनियन लष्करी अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. झेलेन्स्की यांनी या पोस्टमध्ये, युक्रेनने सुमारे दीड वर्षांपूर्वी या हल्ल्याची योजना सुरू केली होती. युक्रेनने रशियाच्या एअरबेसवर हल्ला केला आहे.” अशी माहिती दिली.
झेलेन्स्की यांनी आपल्या पोस्टमध्ये “युक्रेनच्या सुरक्षा ऑपरेशनचे प्रमुख, वासिल मालियुक यांनी आजच्या ऑपरेशनचा अहवाल सादर केला,” असे म्हटले आहे. तसेच पुढे त्यांनी, “निकाल विलक्षण होता. नियोजन एक वर्ष, सहा महिने आणि नऊ दिवसांपूर्वी सुरू झाले. हे आमचे सर्वात लांब पल्ल्याचे ऑपरेशन होते. ऑपरेशनच्या तयारीत सहभागी असलेल्या आमच्या लोकांना रशियन हद्दीतून वेळीच बोलावण्यात आले. युक्रेनच्या या यशाबद्दल जनरल माल्यूक यांचे आभार. मी युक्रेनियन सुरक्षा सेवेला या कारवाईची माहिती जनतेला देण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या सर्व काही सांगता येणार नाही, पण युक्रेनच्या या कृती इतिहासाच्या पुस्तकात नोंदवल्या जातील. रशियाने युद्ध सुरू केले, रशियाचा अंत झालाच पाहिजे. युक्रेनचा गौरव!”असे म्हणत या ऑपरेशन स्पायडरची माहिती दिली.
Head of the Security Service of Ukraine Vasyl Maliuk delivered a report regarding today’s operation. An absolutely brilliant result. A result achieved solely by Ukraine. One year, six months, and nine days from the start of planning to effective execution. Our most long-range… pic.twitter.com/oN41NFYyfw
— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) June 1, 2025
युक्रेनने रशियन एअरबेसवर हल्ला केला Operation Spider Ukraine |
तर दुसरीकडे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने, “युक्रेनियन ड्रोनने पाच हवाई तळांवर हल्ला केला, ज्यामध्ये अज्ञात विमानांचे नुकसान झाले. यापूर्वी, युक्रेनने रविवारी केलेल्या कारवाईत रशियन तळांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करून सुमारे ४० रशियन विमाने नष्ट केल्याचा दावा केला होता.” या ऑपरेशनमध्ये एकूण ११७ ड्रोनचा वापर करण्यात आला आणि तेवढ्याच ड्रोन ऑपरेटर्सचाही यात सहभाग होता. एअरबेसवर तैनात केलेल्या ३४% स्ट्रॅटेजिक क्रूझ मिसाइल कॅरियर्सना लक्ष्य करण्यात आले.
“आज, कीव राजवटीने मुर्मन्स्क, इर्कुत्स्क, इवानोवो, रियाझान आणि अमूर येथील हवाई तळांवर FPV ड्रोन वापरून दहशतवादी हल्ला केला,” असे रशियन संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. इवानोवो, रियाझान आणि अमूर येथील लष्करी हवाई तळांवर केलेले सर्व दहशतवादी हल्ले उधळून लावण्यात आले.”
“मुर्मन्स्क आणि इर्कुत्स्क प्रदेशातील लष्करी हवाई तळांजवळील भागातून सोडण्यात आलेल्या एफपीव्ही ड्रोनमुळे अनेक विमानांना आग लागली,” असे रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, आग विझवण्यात आली आहे.
झेलेन्स्की रशियावर दबाव वाढवणार ? Operation Spider Ukraine |
इस्तंबूलमध्ये होणाऱ्या दुसऱ्या फेरीच्या शांतता चर्चेपूर्वी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की मॉस्कोवर दबाव आणू इच्छितात असा अंदाज वर्तवला जात आहे. सोमवारच्या चर्चेसाठी रशियन अधिकारी व्लादिमीर मेडिन्स्की यांच्या नेतृत्वाखालील एक रशियन शिष्टमंडळ आधीच तुर्कीमध्ये पोहोचले आहे. तथापि, युक्रेनमध्ये तात्काळ युद्धबंदी होण्याची आशा फारशी नाही असे तज्ज्ञांचे मत आहे.





