India- US Trade Agreement : अमेरिकेने काही दिवसांपूर्वी मोठा हल्ला करत थेट व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांचे अपहरण केले. या कारवाईनंतर अमेरिकेवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. दुसरीकडे सध्या व्हेनेझुएलाच्या तेलावर आता पूर्णपणे अमेरिकेचे नियंत्रण आहे. यातच आता भारताने व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करण्याचा प्रस्ताव अमेरिकेने ठेवला आहे. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा देखील थांबली आहे. भारताने व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करावे, असा प्रस्ताव अमेरिकेने ठेवला आहे. भारतातील ऊर्जा मागणी खूप जास्त आहे. रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याने तुटवडा निर्माण होऊ शकतो. या तुटवडा भरून काढण्यासाठी भारताने व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी केले पाहिजे, असे अमेरिकेने म्हंटले आहे. India- US Trade Agreement India- US Trade Agreement भारत-अमेरिकेत व्यापार करार होणार ? जर भारताने व्हेनेझुएलाचे तेल खरेदी केले तर लवकरच भारत आणि अमेरिकेत व्यापार करार देखील होऊ शकतात. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने नुकताच भारताला मोठे संकेत दिले असून तुम्ही व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करू शकता. India- US Trade Agreement दरम्यान, रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने मोठ्या प्रमाणात रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यास सुरूवात केली. त्याचे मुख्य कारण म्हणजे रशिया भारताला अत्यंत कमी किंमतीत हे तेल देत होता. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी यावरून भारतावर काही गंभीर आरोप केले आणि टॅरिफमध्ये वाढ केली. India- US Trade Agreement : हेही वाचा : Ajit Pawar : प्रशासकीय शिस्तीचा धडाका अन् दूरदृष्टीचा नेता हरपला! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अजितदादांना श्रद्धांजली